Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजPravin Darekar : राज ठाकरेंकडे मतचोरीचे पुरावे असतील तर निवडणूक आयोगाला द्यावेत...

Pravin Darekar : राज ठाकरेंकडे मतचोरीचे पुरावे असतील तर निवडणूक आयोगाला द्यावेत – आमदार दरेकर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

येत्या काळात महापालिकेच्या निवडणुका (NMC Election) होणार आहेत. मात्र उद्याचा पराभव दिसत असल्याने विरोधक मतचोरीचे (Vote Chori) आरोप करत आहे. राज ठाकरेंकडे (Raj Thackeray) काही पुरावे असतील तर त्यांनी निवडणूक आयोगाला द्यावेत, त्यांनी केलेले आरोप तोंडी चालत नसतात. असे, वक्तव्य विधानपरीषदेचे माजी विरोधी पक्षनेते व मनसेतूनच भाजपात आलेले आमदार प्रवीण दरकेर यानी पत्रकारांशी बोलताना केले.

- Advertisement -

प्रवीण दरेकर (Pravin Darekar) आज (रविवारी) सहकारी पतसंस्थांच्या कार्यशाळा उद्घाटनासाठी नाशिकला (Nashik) आले होते. यावेळी त्यांनी रायगडनगरला जाण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी काही प्रश्न मुद्दाम पुढे आणले जात आहेत, असे म्हणत राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. पुण्यात (Pune) पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मनसेच्या उमेदवारांना मते मिळतात, मात्र ती मते लाटली जातात. मतचोरी झालेली आहे, असा आरोप केला हाता.

YouTube video player

त्यावर बोलतांना प्रवीण दरेकर म्हणाले की, “राज ठाकरे यांनी केलेले आरोप असे तोंडी चालत नसतात. त्यांच्याकडे काही ठोस पुरावे असतील तर त्यांनी निवडणूक आयोगाला (Election Commission) द्यावेत. निवडणूक हरल्यानंतर अशी कारणे ते देत आहेत. येत्या काळात महापालिकेच्या निवडणुका आहेत. केंद्र आणि राज्य सरकार विकासावर काम करत आहे. त्यांना पराभव दिसत आहे म्हणून असे काही प्रश्न पुढे आणत आहेत”, असे त्यांनी म्हटले .

तसेच यावेळी त्यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या “मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो मग तुम्हाला अडचण काय आहे?” या वादग्रस्त वक्तव्याचाही समाचार घेतला. दरेकर म्हणाले की, “त्यांना हे शोभत नाही. कोणी काय खायचे ते खा, बंदी नाही. मात्र, आपला महाराष्ट्र (Maharashtra) हा वारकरी संप्रदायाचा आहे, एवढे लक्षात असू द्यावे”, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

Crime News : महाराष्ट्र हादरला! सरपंच होण्याच्या हव्यासापोटी नराधम बापाने पोटच्या...

0
नांदेड । Nanded राजकारणाची हाव आणि सत्तेची लालसा माणसाला कोणत्या थराला नेऊ शकते, याचा एक अत्यंत सुन्न करणारा प्रकार नांदेड जिल्ह्यात समोर आला आहे. ग्रामपंचायतीच्या...