Sunday, April 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजKalyan Dombivli Municipal Corporation : केडीएमसी महापालिकेत मोठी राजकीय घडामोड; मनसेचा शिंदेंच्या...

Kalyan Dombivli Municipal Corporation : केडीएमसी महापालिकेत मोठी राजकीय घडामोड; मनसेचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा, भाजप सत्तेपासून दूर?

ठाकरे गटालाही सोबत येण्याची दिली ऑफर

मुंबई | Mumbai

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत (Kalyan Dombivali Municipal Corporation) सत्तास्थापनेसाठी नाट्यमय घडामोड घडली असून, राज ठाकरेंच्या मनसेने (MNS) एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला (Eknath Shinde Shivsena) पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत ठाकरे बंधूंच्या पक्षांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

कल्याण डोंबिवली महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी ६२ हा बहुमताचा आकडा आहे. सध्या शिंदेंच्या शिवसेनेचे
५३ नगरसेवक (Corporator) तर भाजपचे (BJP) ५० नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र, महापालिका निवडणुकीत बहुमत कुणालाही मिळालेले नव्हते. तर ठाकरेंच्या सेनेचे (Shivsena UBT) ११ आणि मनसेचे पाच नगरसेवक निवडून आले होते. मात्र, निकालानंतर ठाकरे गटाचे मधुर म्हात्रे आणि किर्ती ढोणे हे दोन नगरसेवक बेपत्ता झाले होते. ते दोन्ही नगरसेवक शिंदे गटाच्या गळाला लागल्याची चर्चा होती.

हे देखील वाचा : Political News : सर्वोच्च न्यायालयात आज ३० जिल्हा परिषदांच्या निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी; काय निर्णय होणार?

तसेच कोकण विभागीय आयुक्तांकडे आपल्या गटाची नोंदणी करण्यासाठी जाताना ठाकरे सेनेचे दोन नगरसेवक गैरहजर होते. त्यानंतर हे नगरसेवक मनसेच्या गोटात गेल्याची चर्चा होती. त्यामुळे ठाकरे सेनेच्या नगरसेवकांचे संख्याबळ ११ वरुन सातवर आले होते. ठाकरे सेनेत जे दोन नगरसेवक मनसेत गेले होते, ते पूर्वी मनसेचे कार्यकर्ते होते. त्यामुळे या नगरसेवकांनी आम्ही मनसेत गेल्याची भूमिका स्पष्ट केली होती.

दरम्यान, आज (बुधवारी) शिंदे सेना आणि मनसेचे नगरसेवक कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात गट स्थापन करण्यासाठी पोहोचले असता त्यावेळी खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) नरेश म्हस्के आणि मनसेचे माजी आमदार राजू पाटील (Raju Patil) यांची भेट झाली. त्यांच्या या भेटीचा फोटोही लगेचच समोर आला. यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनसेने शिंदे सेनेला पाठिंबा दिल्याचे माध्यमांशी बोलतांना सांगितले. तसेच विकासासाठी जो कोणी बरोबर येईल, त्याला आम्ही सोबत घेऊ, असे म्हणत श्रीकांत शिंदे यांनी ठाकरेंच्या सेनेलाही सोबत येण्याची ऑफर दिली.

हे देखील वाचा : Maharashtra Political News : शिवसेना, राष्ट्रवादीच्या पक्ष आणि निवडणूक चिन्हाचा निर्णय पुन्हा लांबणीवर; आता ‘या’ तारखेला होणार पुढील सुनावणी

केडीएमसी महापालिकेतील पक्षीय बलाबल

नगरसेवकांची एकूण संख्या – १२२

शिवसेना (शिंदे) – ५३
भाजप – ५०
शिवसेना (उबाठा) – ११
मनसे – ५
काँग्रेस – २
राष्ट्रवादी : शरद पवार गट – १

ताज्या बातम्या

Ashok Kharat Crime : सर्वप्रथम शिर्डीत पोहोचले खरातचे ‘डर्टी पिक्चर्स’; ‘सीसीटीव्ही’...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik स्वतःला अवतार मानणाऱ्या अशोक खरातचे (Ashok Kharat) काळे साम्राज्य उद्ध्वस्त होण्यामागे कोणत्याही बाहेरील यंत्रणेपेक्षा त्याच्या 'आतल्या गोटातील' माणसांनी दाखवलेले धाडस...