Saturday, June 7, 2025
HomeराजकीयRaj Thackeray : "मातोश्रीवर चाललोय"; राज ठाकरेंचे 'शिवतीर्थ' हून निघताच मोठे विधान,...

Raj Thackeray : “मातोश्रीवर चाललोय”; राज ठाकरेंचे ‘शिवतीर्थ’ हून निघताच मोठे विधान, नेमकं काय घडलं?

मुंबई | Mumbai 

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Uddhav Thackeray and Raj Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकमेकांना साद प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्रात ठाकरे बंधूंची युती कधी होणार? दोघे भाऊ महाराष्ट्राला एकत्र पाहायला कधी मिळणार? याच चर्चा सुरु आहेत. या दोन्ही भावांच्या युतीच्या चर्चेमुळे माध्यम प्रतिनिधींची बातम्यांसाठी धावपळ होत आहे.

- Advertisement -

मातोश्री आणि शिवतीर्थ या उद्धव आणि राज ठाकरे यांच्या निवास्थानाबाहेर माध्यम प्रतिनिधी (Media Reporter) ठाण मांडून आहेत. अशातच आज दुपारी राज ठाकरे यांनी त्यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानाबाहेरील पत्रकारांची फिरकी घेतली. राज ठाकरेंच्या गुगलीने पत्रकार देखील हसून लोटपोट झाल्याचे दिसून आले. मनसेचे गटाध्यक्ष आणि निरीक्षकांची बैठक ‘शिवतीर्था’वर पार पडली. त्यानंतर बैठक संपल्यावर राज ठाकरे निवासस्थानावरून बाहेर पडले. यावेळी त्यांच्या घराबाहेर उभे असणारे माध्यम प्रतिनिधी गाडीकडे प्रतिक्रिया घेण्यासाठी धावत गेले असता राज ठाकरेंनी त्यांची चांगलीच शाळा घेतली.

आज सकाळपासून राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’निवासस्थानी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची (MNS Worker) बैठक सुरु होती. या बैठकीनंतर राज ठाकरे कारमधून बाहेर निघाले. पुढे कार थांबवून काच खाली केल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींपैकी एक प्रतिनिधी तातडीने कारजवळ धावत आला आणि राज ठाकरेंना, ” साहेब कुठे दौरा?” असा प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरे यांनी “मातोश्रीवर चाललोय” असे मिश्किलपणे उत्तर दिले. त्यानंतर पुढे त्यांनी घरगुती कामासाठी बहि‍णीकडे जात आहे”, असेही
स्पष्ट केले.

दरम्यान, काल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) माध्यमांशी बोलतांना मनसे आणि शिवसेना उबाठा पक्षाच्या युतीवर भाष्य केले होते. ते म्हणाले होते की, “महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. आता संदेश नाही थेट बातमी देईन”, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. युतीसंबंधी जे बारकावे असतील त्यावर आम्ही काय करायचे ते पाहू असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.

YouTube video player

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नितेश

Nitesh Rane: “उध्दव ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात जेलची वारी करु शकतो”; मंत्री...

0
तुळजापूर | Tuljapur एकीकडे राज्यात दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. एकेमागून एक निरोप येऊन धडकत आहेत. तर उद्धव ठाकरे म्हणतात तसा उभा महाराष्ट्र,...