मुंबई | Mumbai
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविषयी बोलतांना ‘वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी ‘एकनाथ शिंदेंना मंत्रिपदाची लॉटरी लागली, पण कमवलेलं टिकवता आलं पाहिजे’ असे विधान काल (शुक्रवारी) केले होते. त्यावरून आज शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही टीकास्त्र सोडले.
राऊत गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना म्हणाले की, “मुळात म्हणजे गिरीश महाजन हे महर्षी व्यास नाहीत. स्वत:च्या खाली काय जळतंय हे त्यांनी पाहवे. ज्या दिवशी त्यांच्याकडे सत्ता नसेल त्या दिवशी त्यांचे काय हाल असेल ते कुठे असतील याचा त्यांनी विचार करावा. उद्या ठाकरे बंधू (Thackeray Brother) हे राजकीय दृष्ट्या एकत्र झाल्यावर त्यांना कळेल. चोर दरोडेखोर हे जे फडणवीसांच्या भोवती आहेत, त्यांना सत्ता नसल्यावर रस्त्यावर फिरणे मुश्कील होईल”, असे त्यांनी म्हटले.
तसेच “आज तुमची मस्ती आहे ती लुटलेल्या पैशांची (Money) आहे, सत्तेची मस्ती आहे. तुम्ही प्रमोद महाजन नाही तर, तुम्ही जळगावचे गिरीश महाजन आहात. आत्मचिंतन करा आपण कोण आहोत आणि आपले काय धंदे आहेत, आणि मग तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या आणि ठाकरे कुटुंबावर बोला. फार आमच्या नादाला लागू नका, सध्या तुम्ही थोडक्यात बचावलेले आहात” असे म्हणत संजय राऊतांनी गिरीश महाजनांवरही (Girish Mahajan) निशाणा साधला.
तर वनमंत्री गणेश नाईक यांनी केलेल्या विधानावर बोलतांना राऊत म्हणाले की, “कुणाला तरी लॉटरी लागली आणि ते मुख्यमंत्री झाले, लॉटरी हा प्रतिष्ठीत शब्द आहे. महाराष्ट्र सरकारसुद्धा (Maharashtra Government) कधीकाळी लॉटरी चालवत होतं. पण आजही महाराष्ट्रात बेकायदेशीर मटका सुरु आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जरी असले तरी आकडा लावला जात आहे. तेव्हा कदाचित गणेश नाईक हे सभ्य आणि संस्कारक्षम असल्यामुळे त्यांनी लॉटरी हा शब्द वापरला, त्यांना मटका हा शब्द वापरायचा असेल”, असे म्हणत त्यांनी नाव न घेता एकनाथ शिंदेंना टोला लगावला.
पुढे ते म्हणाले की, “गणेश नाईक हे आधी शिवसैनिकच होते. शिवसेनेच्या पहिल्या सरकारमध्ये ते मंत्री होते. अनेकदा आम्ही त्यांच्यावर टिका केली, पण गणेश नाईकांनी कधीही संयम सोडून आमच्यावर प्रतिटिका केली नाही. हे पथ्य त्यांनी पाळलं आणि ते अत्यंत महत्त्वाचं असतं. गणेश नाईकांनी मटका लावला नाही. मुळात म्हणजे गणेश नाईकांनी सूचक विधान केले असून, त्यांनी ते ठाणे जिल्ह्यात जाऊन केले आहे, याला महत्व आहे. असेही संजय राऊत यांनी म्हटले.
मटक्याचा आकडा काढणारा दिल्लीत
मटक्याचे आकडे चंचल असतात, चार-चार मटके लोकं चालवतात. एकेकाळी गुन्हेगारी क्षेत्रात मी पत्रकारिता केली आहे.
कारण भाजपचे चंगू मंगू टंगू हे विचारतील. मटक्याची आकडे चंचल असतात, सकाळी वेगळा दुपारी वेगळा आणि रात्री वेगळा. हे आकडे सांभाळता येत नाही आणि यांच्या मटक्याचा आकडा काढणारा दिल्लीमध्ये बसला आहे. ते तिथे जाऊन आकडा लावण्याचा प्रयत्न करतात. पण सध्या यांचा आकडा लागत नाही. हे सांभाळणं कठीण असतं, लवकरच यांचा आकडा अस्तंगत होईल’, अशी टिकाही राऊतांनी विरोधकांवर केली.





