Sunday, June 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSharad Pawar : … तर सत्ताधाऱ्यांना वाढत्या महागाईची किंमत मोजावी लागेल ;...

Sharad Pawar : … तर सत्ताधाऱ्यांना वाढत्या महागाईची किंमत मोजावी लागेल ; गॅस सिलेंडरचे दर वाढताच शरद पवारांचा सरकारला इशारा

मुंबई | Mumbai

केंद्र सरकारने आज (रविवारी) सर्वसामान्यांना आणखी एक आर्थिक झटका दिला असून, घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट चांगलेच कोलमडले आहे. गेल्या तीन महिन्यांत घरगुती गॅसच्या किमतीत झालेली ही दुसरी मोठी वाढ आहे. अल्पावधीतच गॅसच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या धोरणांवर टीका केली आहे.

- Advertisement -

यावेळी ते म्हणाले की, “वाढत्या महागाईचा परिणाम आज सामान्य माणसाच्या प्रपंचावर होत आहे. पंतप्रधानांनी सुरुवातीला आम्ही महागाई नियंत्रित ठेवत असल्याचं सांगितलं. मात्र, नियंत्रित याचा अर्थ टप्प्याटप्प्याने जनतेला धक्का देणं, हे त्यांचं सूत्र दिसत आहे. महागाई नियंत्रणात असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात दरवाढ केली जात आहे. या निर्णयांचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत असून घरखर्चाचे गणित बिघडत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून, याची किंमत त्यांना योग्य वेळी कळेल”, असे शरद पवार यांनी म्हटले.

हे देखील वाचा : LPG Price Hike : सर्वसामान्यांना झटका! घरगुती सिलेंडर महागला; तब्बल ‘इतक्या’ रुपयांची झाली वाढ

घरगुती गॅसच्या दरात २९ रुपयांची वाढ

तेल विपणन कंपन्यांनी ७ जूनपासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ लागू केली आहे. त्यानुसार १४.२ किलोच्या सिलिंडरसाठी दिल्लीत आता ९४२ रुपये मोजावे लागत आहेत. मुंबईत सिलिंडरचा दर ९४१.५० रुपयांवर पोहोचला आहे. याशिवाय कोलकाता, चेन्नई आणि बेंगळुरू या शहरांमध्येही नव्या दरांची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

दोन महिन्यांत जवळपास ९० रुपयांची वाढ

यापूर्वी ७ मार्च रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा २९ रुपयांची वाढ झाल्याने अवघ्या दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत सिलिंडर जवळपास ९० रुपयांनी महागला आहे. त्यामुळे गृहिणींसह मध्यमवर्गीय कुटुंबांचे मासिक बजेट पुन्हा एकदा कोलमडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

Chhagan Bhujbal : राज्यसभेसाठी भुजबळांचे नाव निश्चित! मात्र पुतण्यासाठी घातलेल्या ‘या’...

0
मुंबई | Mumbai राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुणाला संधी...