मुंबई | Mumbai
महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election Result) निकालानंतर प्रत्येक पक्षांकडून आपल्याच पक्षाचा महापौर बसविण्यासाठी आकड्यांची जुळवाजुळव सुरु केली आहे. मात्र, त्याआधी विभागीय आयुक्तांकडे जाऊन प्रत्येक पक्षाकडून (Party) गटाची नोंदणी केली जात आहे. अशातच आज (बुधवारी) कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत (Kalyan Dombivali Municipal Corporation) सत्तास्थापनेसाठी नाट्यमय घडामोड घडली असून, राज ठाकरेंच्या मनसेने (MNS) एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला (Eknath Shinde Shivsena) पाठिंबा दिला. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना नाराज झाली असून, खासदार संजय राऊत यांनी या संपूर्ण प्रकरणावर माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.
हे देखील वाचा : Maharashtra Political News : शिवसेना, राष्ट्रवादीच्या पक्ष आणि निवडणूक चिन्हाचा निर्णय पुन्हा लांबणीवर; आता ‘या’ तारखेला होणार पुढील सुनावणी
यावेळी ते म्हणाले की, “कल्याण-डोंबिवलीतील प्रकरण ठाकरे बंधूंनी गांभीर्याने घेतले असून, हा अतिशय चिंतानजक विषय आहे. याप्रकरणी राज ठाकरेंशी (Raj Thackeray) संवाद झाला असता त्यांनी काही लोकांना काहीच भेटले नसल्याने त्यातून त्यांनी ही भूमिका घेतली असल्याचे म्हटले. मनसेचे माजी आमदार राजू पाटील (Raju Patil) म्हणतात त्याप्रमाणे हा स्थानिक पातळीवरील निर्णय असू शकेल. पण पक्षाच्या मूळ ध्येयधोरणाशी प्रतारणा करून कोणत्याही पक्षाचे स्थानिक नेतृत्व विपरीत भूमिका घेत असेल तर पक्ष नेतृत्वाने (राज ठाकरे) भूमिका घेऊन, थेटपणे कारवाई करत हा निर्णय मान्य नसल्याचे कारवाईतून दाखवून द्यावे,असे संजय राऊत यांनी यांनी म्हटले.
हे देखील वाचा : Kalyan Dombivli Municipal Corporation : केडीएमसी महापालिकेत मोठी राजकीय घडामोड; मनसेचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा, भाजप सत्तेपासून दूर?
पुढे ते म्हणाले, महापालिका निवडणूक शिवसेना-मनसे एकत्रित लढले. एखाद्या चिन्हावर निवडून येऊन कुणी बेडूक उड्या मारत असेल तर नेतृत्वाने कारवाई करून आम्ही निर्णयाशी सहमत नाही, असे दाखवायला पाहिजे. काही दिवसांपूर्वी
अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी असाच प्रयोग केला. मात्र, पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे काँग्रेसने
त्या नगरसेवकांवर कारवाई करून त्यांची पक्षातून हकालपट्टी केली, असे म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अप्रत्यक्षपणे मनसेवर निशाणा साधला.
महाराष्ट्रासाठी शिंदेंचा पक्ष ‘एमआयएम’ आहे
राऊत पुढे म्हणाले की, आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी एकनाथ शिंदे यांचा पक्ष एमआयएम’आहेत. सत्तापिपासू लोक आमच्यासाठी एमआयएम’आहेत. माझ्यावरही ईडीची कारवाई झाली, पण मागे हटलो नाही. काही लोकांच्या मागे तपास यंत्रणा लागल्या असतील.पण म्हणून पक्ष वेठीस धरून गद्दारांशी हातमिळवणी करणे पूर्णत:चुकीचे आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच शिवसेना पक्ष चिन्हावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने ‘सर्वोच्च न्यायालयाने आजही माती खाल्ली, आज तारीख ठरलेली असताना तारीख पुढे ढकलली, असेही राऊतांनी म्हटले.
हे देखील वाचा : BMC Election : उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेत किशोरी पेडणेकरांवर सोपवली मोठी जबाबदारी; ‘या’ पदावर केली नियुक्ती




