Friday, January 23, 2026
Homeमुख्य बातम्याDhule Municipal Corporation Election : धुळ्यात ७४ जागांसाठी 'इतके' उमेदवार रिंगणात; १९९...

Dhule Municipal Corporation Election : धुळ्यात ७४ जागांसाठी ‘इतके’ उमेदवार रिंगणात; १९९ जणांची माघार

धुळे | प्रतिनिधी | Dhule

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी निवडणूक (Dhule Municipal Corporation Election) प्रक्रिया निर्णायक टप्प्यात प्रवेश करत असून, शहरातील एकूण ७४ प्रभागांसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीसाठी प्रारंभी ५१९ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर व माघारीच्या अंतिम टप्प्यात एकूण १९९ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने अखेर ३२० उमेदवार (Candidate) निवडणूक रिंगणात कायम राहिले आहेत.

- Advertisement -

माघारीनंतरची स्थिती पाहता बहुतेक प्रभागांमध्ये दुरंगी, तिरंगी तसेच चौरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले असून काही प्रभागांत उमेदवारांची संख्या अधिक असल्याने प्रचारात तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदारांसमोर (Voter) अनेक पर्याय उपलब्ध होणार असून निवडणूक अधिक चुरशीची ठरणार आहे.

YouTube video player

हे देखील वाचा : Nashik Municipal Corporation Election : १२२ जागांसाठी १३९० रिंगणात; एकूण ६८९ उमेदवारांची माघार

दरम्यान, आज (दि.३ रोजी) निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. त्याच दिवशी अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची प्रभागनिहाय अधिकृत यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. चिन्हवाटपानंतर प्रत्यक्ष प्रचाराला पूर्ण वेग येणार असून राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांकडून घरोघरी प्रचार, सभा, संपर्क मोहिमा राबविण्यात येणार आहेत. आचारसंहितेचे काटेकोर पालन ठेवून शांततेत व पारदर्शक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती तयारी पूर्ण करण्यात आली असून पुढील टप्प्यात प्रचार, मतदान व मतमोजणीच्या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपचा मनपा निवडणुकीत बिनविरोध निवडीचा चौकार

महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून भाजपाने (BJP) बिनविरोध निवडीचा आज चौकार मारला. माघारीच्या अखेरच्या दिवशी मिल परिसरातील प्रभाग क्र. १७ अ मधून विरोधी उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपाचे अमोल मासुळे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. मासुळेंनी यंदा विजयाची हॅट्रीक साधल्याने त्यांच्यासह समर्थकांनी मिल परिसरातील क्रांती चौकात डीजेच्या गजरात गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा आला. येथील महापालिका निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जाच्या छाननीच्या दिवशीच म्हणजे ३१ डिसेंबरला भाजपच्या प्रभाग १ मधील उमेदवार उज्वला भोसले व प्रभाग ६ मधील उमेदवार ज्योत्स्ना पाटील यांची बिनविरोध निवड झाली. या दोन्ही महिला उमेदवारांच्या विरोधातील अन्य उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याने दोघींची बिनविरोध निवड निश्चित झाली.

हे देखील वाचा : Malegaon Municipal Corporation Election : ८४ जागांसाठी ३०१ उमेदवार रिंगणात; २२५ इच्छुकांची माघार

यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जानेवारीला प्रभाग १७व मधील भाजपच्या उमेदवार सुरेखा उगले यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांनी माघार घेतल्याने सौ. उगले यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. आज अर्ज माघारीच्या अखरेच्या दिवशी प्रभाग १७ अ मधील भाजपचेच उमेदवार अमोल ऊर्फ बंटी मासुळे यांच्या विरोधातील उमेदवार प्रदीप खताळ, विनोद जगताप, शेखल कोतवाल, आनंदा पाटील या सर्व उमेदवारांनीही आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे मासुळे यांचीही बिनविरोध निवड निश्चित झाली. दरम्यान मासुळे यांचा आमदार अनुप अग्रवाल यांच्या संपर्क कार्यालयात पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल, आ. अनुप अग्रवाल, आ.राम भदाणे, माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर आदी उपस्थित होते.

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर कर्मचार्‍यांवर गुन्हे दाखलची कारवाई

धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ अनुषंगाने नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व शिपाई यांना निवडणूक प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक असताना पहिल्या प्रशिक्षण वर्गास सुमारे २६० अधिकारी व कर्मचारी जाणीवपूर्वक गैरहजर राहिले. या प्रकाराची आयुक्त तथा निवडणूक अधिकारी नितीन कापडणीस यांनी गंभीर दखल घेतली. सदर गैरहजरी ही शासकीय आदेशाचा अवमान व लोकशाही प्रक्रियेत अडथळा ठरणारी असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यासोबतच लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१, राज्य निवडणूक आयोगाचे आदेश तसेच भारतीय न्याय संहिता अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, ८ जानेवारी रोजी होणाऱ्या दुसऱ्या प्रशिक्षण वर्गास कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी गैरहजर राहिल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता थेट गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. निवडणूक कामकाजाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर झिरो टॉलरन्स धोरणांतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्ह्यात एक लाखांहून अधिक लाडक्या बहिणींची अडचण?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रियेने नगर जिल्ह्यातही महिलांची डोकेदुखी वाढवली. त्यातच जानेवारी महिन्यात अनेक पात्र...