Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ; राज्यपाल देवव्रत,...

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ; राज्यपाल देवव्रत, मुख्यमंत्री फडणवीस, DCM शिंदेंची उपस्थिती

लोकभवनातील दरबार हॉलमध्ये शपथविधी संपन्न

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. लोकभवनातील दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला असून, महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आणि आमदार उपस्थित होते.

- Advertisement -

हे देखील वाचा : Sunetra Pawar : सामाजिक कार्य, अजितदादांना राजकारणात खंबीर साथ ते पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; अशी आहे सुनेत्रा पवारांची राजकीय वाटचाल

YouTube video player

विधानभवनातील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात आज (शनिवारी) दुपारी २ च्या सुमारास आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत सुनेत्रा पवारांची एकमताने गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.माजी मंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवारांच्या नावाचा गटनेते पदासाठी (Group Leader) प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला मंत्री छगन भुजबळांनी,नरहरी झिरवाळ यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सर्व आमदारांनी एकमताने सुनेत्रा पवारांच्या नावाला होकार दिला असता त्यांची गटनेतेपदी नियुक्ती झाल्याचे जाहीर करण्यात आले.

हे देखील वाचा :  Chhagan Bhujbal : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मंत्री भुजबळांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, “त्यांना उपमुख्यमंत्री करणे…”

दरम्यान, यानंतर धनंजय मुंडे, छगन भुजबळ, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, संजय बनसोडे, हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर रवाना झाले. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गटनेते म्हणून सुनित्रा पवार यांची निवड झाल्याचे पत्र दिले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ते पत्र राज्यपालांना पाठवण्यात आले. यानंतर सुनेत्रा पवारांनी लोकभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथ विधीनंतर सुनेत्रा पवार तातडीने बारामतीला रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांचा दहाव्याचा कार्यक्रम होईपर्यंत त्या बारामतीतच मुक्कामी राहणार आहेत.

हे देखील वाचा : Sunetra Pawar : मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या विधीमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवारांची एकमताने निवड

पार्थ पवार राज्यसभेवर जाणार?

सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यावर राज्यसभेतील त्यांच्या रिक्त जागेवर पार्थ पवार यांना पाठवणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपचे केंद्रीय नेतृत्वही त्यांच्या नावासाठी सकारात्मक असल्याचे समजते. तसेच पार्थ पवारांची देखील राज्यसभेवर जाण्याची इच्छा असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पार्थ पवारांची राज्यसभेवर खासदारपदी वर्णी लागणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.

हे देखील वाचा : Sunetra Pawar : सुनेत्रा पवार घेणार मोठा निर्णय; पार्थ पवारांनाही मिळणार जबाबदारी, नेमकं काय घडणार?

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेत पक्षातंर्गत सव्वा-सव्वा वर्षाचा फॉम्युला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या (सोमवार) दिवशी, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीने सत्तेचा स्पष्ट फॉर्म्युला...