Saturday, January 31, 2026
Homeमुख्य बातम्याSunetra Pawar : सुनेत्रा पवार घेणार मोठा निर्णय; पार्थ पवारांनाही मिळणार जबाबदारी,...

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार घेणार मोठा निर्णय; पार्थ पवारांनाही मिळणार जबाबदारी, नेमकं काय घडणार?

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. अजित पवारांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्यामुळे त्यांना आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. थोड्याच वेळात सुनेत्रा पवार आपल्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Maharashtra Politics : दादांची सावली मंत्रालयात; सुनेत्रा पवार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, आज शपथविधी

YouTube video player

मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार राज्यसभेचे सभापती सी.पी.राधाकृष्णन (CP Radhakrushnan) यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द करणार आहेत. या राजीनाम्यानंतर त्यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवड केली जाणार आहे. त्यानंतर आज (शनिवारी) संध्याकाळी ५:३० वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. अवघ्या १० मिनिटांत शपथविधीचा हा कार्यक्रम उरकला जाणार असल्याचे बोलले जात आहे.

हे देखील वाचा : Sunetra Pawar : सामाजिक कार्य, अजितदादांना राजकारणात खंबीर साथ ते पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; अशी आहे सुनेत्रा पवारांची राजकीय वाटचाल

दरम्यान, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ (DCM Oath) घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांचा मंत्रिमंडळातील प्रवेशाचा मार्ग पूर्णपणे मोकळा होणार असून, पक्षांतर्गत प्रक्रियेला वेग येणार आहे. राजभवनावर अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास मुंबईत दाखल होणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजता शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे.

हे देखील वाचा :  Chhagan Bhujbal : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मंत्री भुजबळांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, “त्यांना उपमुख्यमंत्री करणे…”

पार्थ पवार राज्यसभेवर जाणार?

सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यावर राज्यसभेतील त्यांच्या रिक्त जागेवर पार्थ पवार यांना पाठवणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपचे केंद्रीय नेतृत्वही त्यांच्या नावासाठी सकारात्मक असल्याचे समजते. तसेच पार्थ पवारांची देखील राज्यसभेवर जाण्याची इच्छा असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पार्थ पवारांची राज्यसभेवर खासदारपदी वर्णी लागणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.

ताज्या बातम्या

जयंत

Jayant Patil: मोठी बातमी! “अजित पवारांची शेवटची इच्छा होती की…”; जयंत...

0
सांगली | Sangliराज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांची...