Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह निवडणुकांना मंजुरी; सर्वोच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब

मोठी बातमी! नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह निवडणुकांना मंजुरी; सर्वोच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका (Local Body Election) या नवीन प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणासह (OBC Reservation) होणार आहेत. याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार असल्याचे सांगितले. तसेच नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका देखील न्यायालयाने फेटाळल्या आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्रातील (Maharashtra) २७ टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फेटाळली आहे. या याचिकेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये २७ टक्के ओबीसी आरक्षणाला विरोध करण्यात आला होता. त्यानंतर आज (सोमवारी) न्यायालयाने आरक्षणासह निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. यामुळे राज्यात २७ टक्के आरक्षणासह निवडणुका (Election) होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.

YouTube video player

सविस्तर बातमी लवकरच…

ताज्या बातम्या

Praful Patel : प्रफुल पटेलांनी घेतली पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांची...

0
दिल्ली । Delhi महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल...