Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSupriya Sule : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबत सुप्रिया सुळेंचे...

Supriya Sule : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; म्हणाल्या, “तर ही चांगली…”

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Uddhav Thackeray and Raj Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चा झडत आहेत. तसेच दोन्ही ठाकरे एकत्र येण्यापूर्वीच त्यांचे कार्यकर्ते देखील एकत्र येण्यास सुरूवात झाली आहे. त्यातच काल उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी बोलतांना ‘जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. याबाबत जे काही बारकावे आहेत ते आम्ही पाहात आहोत. तुम्हाला फक्त संदेश नाही तर थेट बातमी देईन’, असे म्हटले होते. त्यानंतर आता उद्धव आणि राज ठाकरे खरचं एकत्र येतात का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीबाबत सूचक विधान केले आहे.

- Advertisement -

यावेळी बोलतांना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या की, “लोकशाहीत कोणाला कुणासोबत जायचे, याचा पूर्ण अधिकार आहे. जितके अधिक सहकारी असतील तितके महाविकास आघाडीसाठी (Mahavikas Aaghadi) चांगले आहे. एक साथ मिळून महाराष्ट्रासाठी काम करू, त्यामुळे महाविकास आघाडीची ताकद वाढेल. दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर ही चांगली गोष्ट आहे. राज ठाकरे हे जर सोबत येत असतील तर आम्हाला कोणतीच अडचण नाही”, असे त्यांनी म्हटले.

YouTube video player

तसेच यावेळी सुळे यांना माध्यम प्रतिनिधींनी राज ठाकरे महाविकास आघाडीत सामील होणार का? असा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, “यावर, आता बघुया. महाराष्ट्राच्या हितासाठी ते येणार असतील, तर मी अर्थातच त्याचे स्वागत करीन. एकत्र येणे हा एका सशक्त लोकशाहीमध्ये (Democracy) तो प्रत्येक संघटनेला अधिकार आहे”, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस सरकारसोबत

भारताच्या परिस्थितीबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाशी संवाद साधण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना आम्ही पाठिंबा दिला आहे, असे विरोधी पक्षाने पत्रात म्हटले आहे. सरकारने परदेशी देशांना आणि माध्यमांना माहिती दिली आहे, परंतु संसदेला नाही. भारतातील लोकांना आणि त्यांच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींना अंधारात ठेवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) ने पत्रावर स्वाक्षरी केलेली नाही. वस्तुस्थिती समजून घ्यावी लागेल. मी बाहेर होते. (शरद) पवार साहेबांनी आधीच विधान केले होते की, संपूर्ण ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सरकारसोबत उभी राहील. आम्ही सरकारविरुद्ध एकही शब्द बोलणार नाही. ही क्षुल्लक राजकारण करण्याची वेळ नाही, असे सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले.

ताज्या बातम्या

Accident News : दुचाकी अपघातात आरोग्य सेवकाचा मृत्यू

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner रांजणगाव रोड (Ranjangaon Road) उपकेंद्र येथे आरोग्य सेवक (Health Worker) म्हणून कार्यरत असलेले राम गुणवंतराव जाधव (वय 29) यांचा मंगळवारी (दि.6)...