Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजPolitical News : मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का; नवनिर्वाचित नगरसेविका फुटल्याची...

Political News : मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का; नवनिर्वाचित नगरसेविका फुटल्याची चर्चा

मुंबई | Mumbai

राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election Result) निकालानंतर प्रत्येक पक्षांकडून गट स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरु आहेत. आज (बुधवारी) ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबई गटनेतेपदी माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांची निवड करण्यात आली आहे. मुंबईतील वॉर्ड क्रमांक १९९ मधून पेडणेकर निवडून आल्या असून, त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या रुपल कुसळे यांचा पराभव केला. त्यानंतर आता मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला असून, ६५ पैकी एक नगरसेवक फुटल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Maharashtra Political News : शिवसेना, राष्ट्रवादीच्या पक्ष आणि निवडणूक चिन्हाचा निर्णय पुन्हा लांबणीवर; आता ‘या’ तारखेला होणार पुढील सुनावणी

YouTube video player

मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरेंच्या शिवसेनेकडून वॉर्ड क्रमांक १५७ मधून निवडून आलेल्या डॉ.सरिता म्हस्के यांनी पक्षाची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. आज गटनेता निवडीवेळी शिवसेना भवनातील नगरसेवकांच्या बैठकीला डॉ. सरिता म्हस्के गैरहजर होत्या. त्यांच्या अनुपस्थितीमुळे त्या पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. यानंतर गट नोंदणीच्या प्रक्रियेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व नगरसेवक नवी मुंबईतील कोकण भवन येथे दाखल झाले आहेत. सरिता म्हस्के यांनी भाजपच्या आशा तायडे यांचा पराभव केला आहे.

हे देखील वाचा : BMC Election : उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेत किशोरी पेडणेकरांवर सोपवली मोठी जबाबदारी; ‘या’ पदावर केली नियुक्ती

अपात्र करण्याच्या हालचाली सुरू

शिवसेना भवनातील नगरसेवकांच्या बैठकीला सरिता म्हस्के यांनी दांडी मारल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांना अपात्र करण्यासाठी कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कुठल्याही क्षणी अपात्रतेची कारवाई केली जाऊ शकते.

म्हस्के संपर्कात असल्याचे परबांचे विधान

मुंबईतील वॉर्ड क्रमांक १५७ मधून निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉ.सरिता म्हस्के या नॉटरिचेबल असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर ठाकरे सेनेचे आमदार अनिल परब यांनी म्हस्के आपल्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे म्हस्के नेमक्या कुठे आहेत हे लवकरच स्पष्ट होईल.

हे देखील वाचा : Political News : सर्वोच्च न्यायालयात आज ३० जिल्हा परिषदांच्या निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी; काय निर्णय होणार?

मुंबई महापालिकेत कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक?

भारतीय जनता पार्टी – ८९
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – ६५
शिवसेना (शिंदे गट) – २९
इंडियन नॅशनल काँग्रेस – २४
ऑल इंडिया मजलिस इत्तेहादूल मुस्लिमीन – ८
महाराष्ट्र नवनिर्माण सेना – ६
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – ३
समाजवादी पार्टी – २
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) – १

ताज्या बातम्या

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव देणार?;...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सध्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' ही सर्वाधिक चर्चेची आणि लोकप्रिय ठरलेली योजना आहे. मात्र, आता ही योजना केवळ महिलांच्या...