मुंबई | Mumbai
राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान (Voting) होणार असून, १६ जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षांकडून प्रचारास सुरुवात करण्यात आली आहे. यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून (Shivsena UBT) ४० जणांची स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : Nashik Politics : ठाकरे बंधूंची नाशिकमध्ये ‘या’ तारखेला संयुक्त सभा; २० वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर
सदर यादीमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, अनिल परब सुषमा अंधारे, वरूण सरदेसाई, अंबादास दानवे, अनिल देसाई, विनायक राऊत, आनंद दुबे, आदेश बांदेकर यांच्यासह आदी नावांचा समावेश आहे.
स्टार प्रचारकांच्या यादीत कुणाचा समावेश?
उद्धव ठाकरे
आदित्य ठाकरे
शुभाष देसाई
संजय राऊत
अनंत गीते
चंद्रकांत खैरे
अरविंद सावंत
भास्कर जाधव
अनिल देसाई
विनायक राऊत
अनिल परब
राजन विचारे
सुनील प्रभू
आदेश बांदेकर
वरुण सरदेसाई
अंबादास दानवे
रवींद्र मिरलेकर
नितीन पाटील
राजकुमार बाफना
प्रियांका चतुर्वेदी
सचिन अहिर
लक्ष्मण वाढले
मनोज जामसुतकर
नितीन देशमुख
सुषमा अंधारे
संजय जाधव
ज्योती ठाकरे
जयश्री शेळके
जान्ह्वी सावंत
शरद कोळी
ओमराजे निंबाळकर
सुनील शिंदे
हारुन खान
सिद्धार्थ खरात
वैभव नाईक
आनंद दुबे
अशोक तिवारी
राम साळगावकर
प्रियांका जोशी
अनिश गाढवे




