नाशिक | Nashik
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) रणधुमाळी सुरु असून अनेक नेते पक्षांतर करत आहेत. यात महाविकास आघाडीतील (Mahavikas Aagahdi) शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये (Sharad Pawar NCP) मोठ्या प्रमाणावर इनकमिंग पाहायला मिळत आहेत. महायुतीमधील घटक पक्ष असणाऱ्या पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माजी आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सामील होत आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकत चांगलीच वाढतांना दिसत आहे.
हे देखील वाचा : नाशकात भाजपला मोठा धक्का! माजी सभापती शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
अशातच आज नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शीतल सांगळे यांचे पती आणि सिन्नर पंचायत समितीचे माजी गटनेते उदय सांगळे (Uday Sangle) यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी त्यांच्या गळ्यात तुतारी चिन्हाचा गमझा घालून त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते.
हे देखील वाचा : नाशिक जिल्ह्यात भाजपला मोठे भगदाड; नगरपंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह १५ नगरसेवकांचे राजीनामे
दरम्यान, उदय सांगळे हे सिन्नर विधानसभा मतदारसंघातून (Sinnar Assembly Constituency) निवडणूक लढविण्यास इच्छुक असून या पार्श्वभूमीवर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश देण्यात आल्याचे बोलले जात आहे. या विधानसभा मतदारसंघातून महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सिन्नर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार अॅड.माणिकराव कोकाटे (MLA Manikrao Kokate) यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात तुल्यबल लढत बघायला मिळणार आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा