Monday, July 1, 2024
Homeनंदुरबारराज्य शासनाच्या निष्काळजीपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात

राज्य शासनाच्या निष्काळजीपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात

नंदुरबार | प्रतिनिधी Nandurbar

- Advertisement -

राज्य शासनाच्या निष्काळजीपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहेत. नुकत्याच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. आतातरी शासनाने न्यायालयाकडे ओबीसींचा आवश्यक तो डाटा जमा करावा व निवडणुकांना स्थगित मिळवावी, अशी मागणी करतच येत्या २६ जून रोजी नंदुरबार व शहादा येथे चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा खा.रक्षा खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

खा.खडसे म्हणाल्या, ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. हे आरक्षण टिकावे यासाठी आवश्यक ती माहिती सादर करण्यासाठी राज्य शासनाला न्यायालयाने दोन महिन्यांची मुदत दिली होती.

परंतू तब्बल १६ महिने शासनाने न्यायालयात ओबीसींची माहिती दिली नाही. त्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. राज्यात ओबीसी समाज मोठया प्रमाणावर आहे. मात्र, राजकीय आरक्षण नसल्यामुळे त्यांना निवडणूका लढता येणार नाही,

त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला आहे. नुकत्याच नंदुरबारसह राज्यातील पाच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकांपुर्वीतरी शासनाने ओबीसींची माहिती न्यायालयात सादर करुन ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधीत ठेवण्यासाठी पाऊले उचलणे गरजेचे आहे.

तसेच निवडणुका स्थगित करण्यासाठी प्रयत्न केले आहे. जेणेकरुन ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही. मराठा आरक्षणाबाबतही शासनाने न्यायालयात बाजू मांडली नाही म्हणून त्यांचेही आरक्षण गेले असल्याने मराठा समाजावरही अन्याय झाला आहे.

याचा निषेध म्हणून दि. २६ जून रोजी राज्यभर भाजपातर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्हयातील नंदुरबार व शहादा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे, असेही खा.खडसे यांनी सांगितले. यावेळी खा.डॉ.हीना गावित, आ.राजेश पाडवी, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, निलेश माळी आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या