Friday, October 18, 2024
HomeनाशिकPolitical Special : विधानसभेसाठी मनसेना रिंगणात; जिल्ह्यात स्वबळावर १४ जागांवर तयारी

Political Special : विधानसभेसाठी मनसेना रिंगणात; जिल्ह्यात स्वबळावर १४ जागांवर तयारी

नाशिक | फारुक पठाण

मुंबईत झालेल्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपण विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) स्वबळावर लढणार असल्याचे सांगतांना आपला पक्ष सत्तेतला पक्ष राहणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे मनसेना राज्यात किंगमेकर होणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) १५ पैकी १४ जागांवर आपले सक्षम उमेदवार निवडणूक लढण्यासाठी तयार सल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख यांनी दिली.

- Advertisement -

हे देखील वाचा : मोठी बातमी! चांदवडमधून राहुल आहेरांची भावासाठी माघार; पक्षाकडे उमेदवारी देण्याची केली मागणी

२००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत मनसेनेने चमत्कार केले होते. राज्यात २८८ पैकी १३ आमदार (MNS) मनसेनेचे होते, तर शहरातील चार पैकी तीन आमदार होते. आता पुन्हा त्यापेक्षा जास्त संख्येने आपले उमेदवार (Candidate) निवडून येणार असल्याचा दावा पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. मनसेना अध्यक्ष राज ठाकरे यांना नाशिककरांनी (Nashik) वेळोवेळी मोठा पाठिंबा दिला आहे.

हे देखील वाचा : Nirmala Gavit : इगतपुरी मतदारसंघाचे राजकीय समीकरण बदलणार; निर्मला गावित काँग्रेसमध्ये परतणार?

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात राज ठाकरे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला होता. जिल्हानिहाय पदाधिकारी, इच्छुकांशी त्यांनी चर्चाही केली. दौरा आटोपल्यानंतर पक्षीय पातळीवर शांतता झाली आहे. इच्छुकांकडून त्यांच्या स्तरावर पक्षाच्या चिन्हासह मतदारसंघात, समाज माध्यमांवर (Social Media) प्रचार सुरू आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. तर आता विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहे.

हे देखील वाचा : Sameer Wankhede : डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे उतरणार निवडणुकीच्या रिंगणात; ‘या’ पक्षाकडून उमेदवारी मिळणार

राज्यात महायुती विरुध्द महाविकास आघाडी (Mahayuti and Mahavikas Aaghadi) यांच्यात रोज आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून राजकारण प्रचंड तापले आहे. मागील पाच वर्षाच्या कालावधीत म हायुती व महाविकास आघाडी यांच्यात सत्ताकारणावरुन पक्ष फोडाफोडी, जोरदार चिखलफेक सुरु आहे. त्यामुळे जनतेलाही हा तमाशा नकोसा झाला आहे. ते पाहता महायुतीसोबत न जाता ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेत मनसेनेला संधी द्या या रणनितीवर विधानसभेला सामोरे जायची तयारी सुरु असल्याचे दिसत आहे.

हे देखील वाचा : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला; ‘या’ नेत्याला मिळाली संधी

महाराष्ट्र निर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी घोषित केल्याप्रमाणे महाराष्ट्र निर्माण सेना विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहे. नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी मालेगाव मध्य सोडून सर्व १४ जागा आम्ही लढणार आहे. आमच्याकडे सक्षम उमेदवार असून निवडणुकीची तयारी मागील काही महिन्यांपासून सुरू होती, ती अंतिम टप्प्यात आली आहे.

सलीम शेख, प्रदेश उपाध्यक्ष, मनसेना

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या