Friday, October 18, 2024
HomeराजकीयPolitical Special : बंडाचे झेंडे फडकले तर…

Political Special : बंडाचे झेंडे फडकले तर…

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Elections) तोंडावर आहेत. २८८ पैकी जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी महायुतीतील (Mahayuti) प्रत्येक पक्ष सज्ज झाला आहे. एकूण जागा व इच्छुकांची संख्या पाहता कोणाचेही १०० टक्के समाधान होणे शक्य होणार नाही. अशावेळी बंडाचे झेंडे फडकले तर… अशा विविध चर्चाना आता उधाण आले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Political Special : चहा कट्ट्यावर गप्पा, उमेदवार कोण पक्का?

भाजपचे चाणक्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी पुढील पंचवार्षिक निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा देऊन मित्र पक्षांच्या पोटात गोळा आणला आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही जास्तीत जास्त जागांवर निवडणूक (Election) लढवण्याची इच्छा आहे. जागावाटपाच्या वेळी भाजपला दोन पक्षांसोबत बोलणी करावी लागणार आहे. त्याशिवाय काही छोटे पक्ष आहेत. त्यात महादेव जानकर, सदाभाऊ खोत, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही काही जागांचा प्रस्ताव ठेवला आहे.

हे देखील वाचा : Haryana and Jammu-Kashmir Elections Results : हरियाणात भाजपचा तर जम्मू-काश्मीरमध्ये इंडिया आघाडीचा विजय; कुणाला मिळाल्या सर्वाधिक जागा?

आता स्वतःच्या जागा कमी न करता मित्रपक्षांचेही समाधान करताना चांगली कसोटी लागणार आहे. गेल्या २०१४ ला २६० जागा लढवून १२२ जागा भाजपने (BJP) मिळवल्या होत्या. तर २०१९ ला १६४ जागांवर निवडणूक लढवून १०५ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष राहिला. सव्वादोनशे मतदार संघात भाजपचे वर्चस्व असले तरी यंदाच्या निवडणुकीत काही आव्हाने उभी राहिली आहेत. गेल्या २०१९ च्या निवडणुकीत ज्या जागांवर भाजप दुसऱ्या क्रमांकावर होता त्या ठिकाणी स्वपक्षाचे उमेदवार तिकीट मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांचा पत्ता कट झाल्यास त्यांना महायुतीच्या उमेदवाराला स्वीकारण्याशिवाय अथवा बंडाचा झेंडा हाती घेऊन निवडणूक लढवण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

हे देखील वाचा : मोठी बातमी! मंत्रालयातील जाळीवर धनगर समाजाच्या आंदोलकांच्या उड्या

एकीकडे असे असताना केंद्रीयमंत्री रामदास आठवले त्यात पुन्हा यांनी रिपब्लिकन पक्षाला (RPI) विधानसभेला जागा मिळाल्या पाहिजेत. शिवाय अन्य मागण्यांची यादी समोर ठेवली आहे. रिपब्लिकन पक्षाला विधानसभेच्या १० ते १२ जागा मुंबई, कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात दिल्या जाव्यात असा त्यांचा आग्रह आहे. तसेच १ विधान परिषद सदस्यत्व आणि २ महामंडळाची चेअरमन पदे व महामंडळाची सदस्यपदे रिपब्लिकन पक्षाला देण्यात यावी अशी आग्रही मागणी आहे. त्यामुळे जागा वाटपाबाबत एकमत अवघड झालेले आहे.

हे देखील वाचा : J&K Election Result 2024 : भाजपला मोठा धक्का; प्रदेशाध्यक्षांचा पराभव

दरम्यान, जास्तीत जास्त जागा पदरात पडाव्यात अशी तिन्ही पक्षांची रणनिती असताना राष्ट्रीय समाज पक्षाचे (RSP) नेते महादेव जानकर यांनीही वीस ते पंचवीस जागांची अपेक्षा केली आहे. शिवाय सदाभाऊ खोत यांनीही विधानसभेला जागा मागितल्यां आहेत. अशा वेळी या घटक पक्षाचे समाधान करुन स्वपक्षातही बंडाळी उफाळू न देता निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी भाजप कसा मार्ग काढतो,याचीच उत्सुकता लागली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या