Tuesday, March 25, 2025
HomeराजकीयPolitical Special : महाविकाससह महायुतीचा मुस्लिम मतांवर डोळा

Political Special : महाविकाससह महायुतीचा मुस्लिम मतांवर डोळा

नाशिक | फारुक पठाण

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच राजकीय पक्षांचा डोळा मुस्लिम मतदारांवर (Muslim Voters) आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकप्रकारे महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) अल्पसंख्यांक समाजाने मोठ्याप्रमाणात साथ दिल्याने आता विधानसभा निवडणुकीत हे मतदान आपल्याकडे खेचण्यासाठी महाविकास आघाडीसह महायुतीतील (Mahayuti) पक्षांनी तयारी सुरु केल्याचे दिसत आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी तर १० टक्के मुस्लिम उमेदवार देणार असल्याची चर्चा देखील रंगत आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : “NDA मध्ये आल्यास केंद्रीय मंत्रिपद देतो”; प्रकाश आंबेडकरांना ‘या’ नेत्याची मोठी ऑफर

महायुतीतील भारतीय जनता पक्ष (BJP) सोडून इतर पक्षांनी मुस्लिम समाजाला खुश करण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न सुरू केल्यामुळे तो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. मुंबईतील शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी तर आपल्या मतदारसंघातील मुस्लिम महिलांना थेट बुरखा वाटप केल्याने त्याची मोठी चर्चा रंगत आहे. तर एकेकाळी मशिदींवरी भोंग्यावरुन वाद निर्माण करणाऱ्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) पंढरपूर ते अजमेर शरीफ असा प्रवास मुस्लिम समाजाच्या लोकांना घडून आणण्यात आला. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षकडून देखील विविध प्रकारे अल्पसंख्यांक समाजाला सोबत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

हे देखील वाचा : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा कधी सुटणार? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

त्यामुळे शहरातील चार पैकी मध्य नाशिक (Central Nashik) हा मुस्लिम बहुल मतदारसंघात देखील हालचाली वाढल्या आहेत. या ठिकाणी मुस्लिम मतदार निर्णायक आहे. यामुळे या ठिकाणी मुस्लिम उमेदवार द्यावा, अशी मागणी देखील आता मुस्लिम नेत्यांकडून महाविकासच्या नेत्यांकडे होत असल्यामुळे नवीन पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. काही मुद्द्यांवरून अल्पसंख्यांक समाज भाजपावर नाराज असल्यामुळे त्याचा थेट फायदा महाविकास आघाडीला होत आहे. मात्र, आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील पक्षांनी मुस्लिम मतदारांना खुश करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याने त्याचा किती परीणाम होतो हे पाहणे उत्सुक्तेचे ठरणार आहे.

हे देखील वाचा : …तर हे औदार्य महागात पडेल; ‘या’ चित्रपटाच्या प्रदर्शनावरून राज ठाकरेंना थेट इशारा

मध्यमध्ये मुस्लिम उमेदवार द्या

एका अंदाजाप्रमाणे राज्यातील सुमारे ७० पेक्षा जास्त जागांवर मुस्लिम मतदार हा निर्णायक भूमिकेत आहे. तर सुमारे २२ जागांवर ४० ते ५० टक्केपर्यंत मुस्लिम समाजाचे प्राबल्य आहे.त्यात नाशिक शहरातील मध्य नाशिकचा समावेश आहे.या ठिकाणी सुमारे ६० हजाराच्या जवळपास मुस्लिम मतदार आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला येथील मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून राजाभाऊ वाजे यांना खासदार केले.त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत महाआघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन मध्य नाशिकमध्ये मुस्लिम उमेदवार द्यावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची राज्यातील अल्पसंख्यांक नेत्यांनी भेट घेऊन मुस्लिम समाजाला प्राधान्य देण्याची मागणी केली आहे. त्यात नाशिक मध्यची जागा काँग्रेस पक्षाला सोडावी, अशी मागणी अल्पसंख्याक काँग्रेसचे शहराध्यक्ष हनिफ बशीर यांनी केली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...