Thursday, November 7, 2024
HomeनाशिकNashik Political : आमदार खोसकर कोणाचे? ठेकेदारांचे की जनतेचे?

Nashik Political : आमदार खोसकर कोणाचे? ठेकेदारांचे की जनतेचे?

माजी सभापती सोमनाथ जोशी यांचा हल्लाबोल

नाशिक | विशेष प्रतिनिधी | Nashik

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघात (Igatpuri Assembly Constituency) आमदार हिरामण खोसकर (MLA Hiraman Khoskar) फक्त काही निवडक पुढाऱ्यांचे आणि ठेकेदारांचे आमदार राहिले आहेत का? कारण खोसकर यांच्या सोबत प्रत्येक कार्यक्रमात फक्त पुढारी आणि ठेकेदारच मागे-पुढे फिरताना दिसत आहेत. मतदारसंघातील कामे ज्या ठेकेदारांना दिली ती कामे संबंधित ठेकेदारांनी चांगल्या दर्जाची केलेली नाहीत. त्यामुळे याच ठेकेदारांमुळे खोसकरांवर मतदारसंघातील जनतेचा रोष मोठ्या प्रमाणावर आहे.खोसकरांचा ठेकेदारांवर कुठलाही दबाव नसल्याचे लोक सांगत आहेत. त्यामुळे खोसकर आमदार नेमके कोणाचे? ठेकेदार आणि पुढाऱ्यांचे? की जनतेचे? असा हल्लाबोल इगतपुरी पंचायत समितीचे माजी सभापती सोमनाथ जोशी यांनी केला.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : पूर्वसाठी ॲड. ढिकलेंचे नेतृत्व आवश्यक; प्रचार दौऱ्यात संभाजी मोरूसकर यांचे प्रतिपादन

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघात १७ उमेदवार (Candidate) रिंगणात आहेत. राष्ट्रवादीचे (अजित पवार) हिरामण खोसकर, काँग्रेसचे लकी जाधव, मनसेनेचे काशिनाथ मेंगाळ आणि अपक्ष उमेदवार माजी आमदार निर्मला गावित यांच्यात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या आमदार हिरामण खोसकर यांच्याबद्दल मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर नाराजीचे वातावरण जाणवत आहे. त्यामुळे सामान्य जनता आमदार खोसकर यांना नक्कीच धडा शिकवेल, असा विश्वास जोशी यांनी व्यक्त केला.

हे देखील वाचा : Nashik Political : आनंदवल्ली, गंगापूरमधून सीमा हिरेंना मोठे मताधिक्य मिळणार – कडलग

गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात (Constituency) मोठ्या प्रमाणावर विकासकामे केल्याचा दावा खोसकर करतात. मात्र, ही विकासकामे केवळ कागदोपत्री असल्याचे मतदारसंघातील लोक सांगत आहेत. खोसकर यांनी रस्त्यांच्या विकासकामांच्या नुसत्या पाट्या लावल्या आहेत. अजूनही काही ठिकाणी कामे केलेली नाहीत. काही ठिकाणी कामे केली ती चांगल्या दर्जाची झालेली नाहीत. उन्हाळ्यात रस्ता तयार केला की, तो पहिल्याच पावसात उखडून जात आहे. त्यामुळे खोसकर यांच्याबद्दल मतदारांमध्ये (Voters) नाराजी आहे त्याचा फटका त्यांना विधानसभा निवडणुकीत बसेल, असा अंदाजही जोशी यांनी व्यक्त केला.

हे देखील वाचा : गुरुदेव कांदे यांच्या प्रचाराचा नांदुर्डीत शुभारंभ

मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत अनेक आरोग्य केंद्रांची कामे केल्याचे खोसकर सांगतात, पण मतदारसंघातील बऱ्याच आरोग्य केंद्रांची परिस्थिती ‘जैसे थे’ दिसत आहे. मतदारसंघातील बऱ्याच गावांत अजूनही उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. महिलांना हंडाभर पाण्यासाठी एक-दोन किलोमीटर पायपीट करावी लागते. हा मतदारसंघ आदिवासीबहुल असल्याने या भागात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीची समस्या आहे. गेल्या पाच वर्षांत खोसकरांना पाण्याचा, आरोग्याचा आणि बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यात पूर्णतः अपयश आले आहे. त्यामुळे विकासाच्या गप्पा मारणाऱ्या खोसकरांना यावेळच्या निवडणुकीत धडा शिकवण्याचा निर्धार मतदारसंघातील जनतेने केला आहे, असा दावाही सोमनाथ जोशी यांनी केला.

हे देखील वाचा : Nashik Political : मांजरपाड्याच्या पाण्याने नांदगाव तालुका समृद्ध करणार; मांडवड, भालूर प्रचारदौऱ्यात समीर भुजबळ यांची ग्वाही

दरम्यान, खोसकरांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) तोडांवर काँग्रेसचा ‘हात’ सोडून राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हातावर बांधले. त्यामुळे दलबदलू खो सकराबद्दल मतदारांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. त्यांनी पक्षासोबत ‘गद्दारी’ केल्याची भावना आहे. विधान परिषद निवडणुकीत खोसकरांनी विरोधी पक्षाकडून पैसे घेऊन क्रॉस व्होटिंग केले. त्यामुळेच काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारण्याचा निर्णय घेतला, असे त्यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते सांगतात, असेही जोशी म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या