Tuesday, July 16, 2024
Homeमुख्य बातम्याPolitical Special : कर्नाटकची पुनरावृत्ती?

Political Special : कर्नाटकची पुनरावृत्ती?

नाशिक | मोहन कानकाटे | Nashik

- Advertisement -

आगामी २०२४ ची लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असून या निवडणुकीच्या अगोदरच केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेश, तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. या पाच राज्यांच्या निवडणुका भाजप, कॉंग्रेसह इतर पक्षांसाठी लोकसभेच्या दृष्टीने महत्वाच्या असणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांकडे लोकसभेची रंगीत तालीम म्हणून बघितले जात आहे.

निवडणुकीच्या घोषणेनंतर या पाच राज्यांमधील भाजप, कॉंग्रेस, बीआरएस आणि इतर वेगवेगळे पक्ष कामाला लागले असून काही पक्षांनी आपले उमेदवार (Candidate) देखील जाहीर केले आहेत. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होणार असून विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) रंगत पाहायला मिळणार आहे. पंरतु, ही निवडणूक इतर पक्षांसह कॉंग्रेससाठी देखील आगामी लोकसभेच्या अनुषंगाने महत्वाची असणार आहे. कारण २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात कॉंग्रेसची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे आगामी लोकसभेच्या निवडणुकीआधी या पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालातून कॉंग्रेसला (Congress) ‘अच्छे दिन’ येणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना मालेगाव कोर्टात हजर राहण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?

देशातील बहुतांश राज्यांमध्ये २०१४ च्या आधी कॉंग्रेसची सत्ता होती. मात्र, त्यानंतर केंद्रात भाजपची (BJP) सत्ता आल्यापासून भाजपने अनेक महत्वाच्या राज्यांमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून सत्तास्थापन केली. भाजपने कॉंग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करून विविध राज्यांतील कॉंग्रेसची सत्ता उलथवून लावली. तर लोकांनी देखील कॉंग्रेसच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून भाजपला पर्याय म्हणून निवडले. यानंतर बऱ्याच राज्यांमध्ये अनेक नेत्यांनी कॉंग्रेसचा ‘हात’ सोडून भाजपचे कमळ हाती घेतले. त्यामुळे कॉंग्रेस आणखी खिळखिळी झाली. 

त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने लोकसभेच्या जास्त जागा जिंकत पुन्हा एकदा केंद्रात सत्ता मिळवली. यानंतर पुन्हा भाजपने कॉंग्रेसला टार्गेट करत विविध राज्यांमधील सत्ता प्रस्थापित केली आणि इतर राज्यांतून देखील कॉंग्रेसची सत्ता उलथवून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही राज्यांमधील जनतेने पुन्हा एकदा कॉंग्रेसच्या हाती सत्ता दिल्याचे पाहायला मिळाले. हे सर्व कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी देशभरातील विविध राज्यांतून काढलेल्या भारत जोडो यात्रेचे फलित असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. मागील वर्षी हिमाचल प्रदेश आणि काही महिन्यांपूर्वी कर्नाटक विधानसभेची निवडणूक पार पडली. या दोनही राज्यांमध्ये आधी भाजपची सत्ता होती. त्यानंतर हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकच्या जनतेने कॉंग्रेसच्या बाजूने कौल दिला आणि भाजपचा दारूण पराभव झाला. त्यामुळे कर्नाटकची (Karnataka) पुनरावृत्ती आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Deshdoot Special : पालकमंत्र्यांचा ‘दम’ अन् पोलिसांची ‘दमछाक’; नाशिककरांना अशीच ‘पोलिसींग’ हवी

- Advertisment -

ताज्या बातम्या