Friday, October 18, 2024
Homeब्रेकिंग न्यूजPolitical Special : खोसकरांची जाळीवर उडी यशस्वी ठरेल का?

Political Special : खोसकरांची जाळीवर उडी यशस्वी ठरेल का?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आमदार हिरामण खोसकर (MLA Hiraman Khoskar) यांनी आदिवासींच्या प्रश्नासाठी मंत्रालयाच्या जाळीवर उडी घेतली होती. ती उडी यशस्वी ठरेल का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून कधीही आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षांकडून उमेदवारांच्या चाचपणीसह इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांपैकी सध्या इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा (Igatpuri Trimbakeshwar Constituency) हा मतदारसंघ येथील विद्यमान आमदार हिरामण खोसकरांमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. कारण विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंगमुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या खोसकर यांच्या आगामी विधानसभेतील उमेदवारीवर काँग्रेस पक्षाने ‘फुली’ मारल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र,तरीही खोसकर काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत असून पक्षातील नेत्यांशी माविआच्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Political Special : नाशकात मिसळ पार्ट्यांचा जोर

दोन दिवसापूर्वीच नाशिकमध्ये (Nashik) काँग्रेसचे निरीक्षक आमदार कुणाल पाटील (MLA Kunal Patil) यांनी जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या (Interview) मुलाखती घेतल्या. या मुलाखतीसाठी इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हिरामण खोसकर हे देखील हजर होते. यावेळी त्यांनी इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार (Candidate) म्हणून मुलाखत दिली. मात्र, मुलाखतीला जातांना एका उमेदवाराच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो आनंद खोसकर यांच्या चेहऱ्यावर कुठेही दिसला नाही. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी खोसकर यांनी पुणे गाठत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि मविआचे नेते शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेत त्यांना आपल्या उमेदवारीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी बोलण्याची विनंती केली. तसेच माध्यमांशी बोलतांना ‘मला काँग्रेसकडून जर उमेदवारी मिळाली नाही तर माझ्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत’, असे म्हणत खोसकरांनी एकप्रकारे पक्षांतराचे संकेत देखील दिले.

हे देखील वाचा : Nashik Crime News : दामदुपट्ट आमिषाने २०० कोटींचा गंडा

काही दिवसांपूर्वी आमदार हिरामण खोसकर यांनी इगतपुरीतील (Igatpuri) एका स्थानिक नेत्याच्या माध्यमातून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याशी संपर्क साधल्याचे बोलले जात आहे. इगतपुरी मतदारसंघात आमदार खोसकर यांचा किती प्रभाव आहे, हे राऊत यांच्या या स्थानिक नेत्याने निदर्शनास आणून दिल्याची माहिती आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना इगतपुरी विधानसभा मतदारसंघात मिळालेली एक लाख मते खोसकर यांच्यामुळेच मिळाली असल्याचा दावा या स्थानिक नेत्याने राऊत यांच्याकडे केल्याचे कळते. खोसकरांच्या या धावपळीमुळे काँग्रेसकडून त्यांची उमेदवारी धोक्यात असल्याच्या चर्चेवर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

हे देखील वाचा : Nashik News : ‘होम अरेस्ट’ला अटकाव; मोबाईलमध्ये फीचर

काँग्रेसचा उमेदवार कोण?

महाविकास आघाडीच्या जागावाटपात इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला सुटण्याची दाट शक्यता आहे. इगतपुरी मतदारसंघातून सर्वाधिक १३ इच्छुकांनी मुलाखत दिली आहे. त्यात हिरामण खोसकर यांचाही समावेश आहे.काँग्रेसने खोसकर यांच्या उमेदवारीवर फुली मारली असेल तर पक्षाचा उमेदवार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.तर मतदारसंघातून दोन वेळा काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या माजी आमदार निर्मला गावित यांच्याही नावाची काँग्रेसकडून चाचपणी केली जात आहे. सध्या गावित या शिवसेना ठाकरे पक्षात आहेत त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घेऊन उमेदवारी देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु असल्याचे बोलले जात आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : सायबर चोरट्यांनी शेअर ट्रेडिंग आणि वर्क फ्रॉमचे आमिष दाखवून ३७ लाख उकळले

तालुकाध्यक्ष एकनिष्ठपणे काम करणार का?

इगतपुरी विधानसभा मतदारसंघ हा दोन तालुके मिळून बनलेला आहे. त्यात त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरीचा समावेश आहे. या दोन्ही तालुक्यांत काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग असल्याने गेल्या तीन टर्मपासून या मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार निवडून येत आहे. त्यामध्ये त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या दोन्ही तालुक्यांमधील काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांचा सिहांचा वाटा आहे. २०१९ च्या निवडणुकीत खोसकर यांना निवडून आणण्यासाठी या दोन्ही तालुकाध्यक्षांची मोठी भूमिका होती. त्यानंतर गेल्या पाच वर्षांत या दोन्ही तालुकाध्यक्षांचे खोसकर यांच्याशी सलोख्याचे संबध प्रस्थापित झाले आहेत. त्यामुळे जर काँग्रेसने खोसकर यांना आगामी निवडणुकीत उमेदवारी नाकारली तर हे दोन्ही तालुकाध्यक्ष इतर उमेदवारासाठी पक्षाचे एकनिष्ठपणे काम करणार का? याची आतापासूनच मतदारसंघात दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली आहे. तसेच खोसकरांनी अपक्ष किंवा इतर पक्षाकडून निवडणूक लढविल्यास त्यांना आतून देखील या दोन्ही तालुकाध्यक्षांकडून रसद पुरवली जाऊ शकते, असे या मतदारसंघातील मतदारांचे म्हणणे आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या