नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक
चारशे कोटींच्या कंटेनरच्या कथित लुटीचे प्रकरण प्रत्यक्षात घडलेच नसल्याबाबत पोलिसांचे मत तयार होऊ लागले असले तरी प्रत्यक्षात मग हे प्रकरण काय होते त्याची उत्तरे शोधण्यासाठी मुळात संदीप पाटील याच्या फिर्यादीवर एकतर विश्वास ठेवावा लागेल किंवा ती सरसकट फेटाळून प्रकरण रफादफा तरी करावे लागेल. सध्यातरी या प्रकरणाला उत्तर नाही किंवा अंतही नाही, अशा या प्रकरणाची पारदर्शीपणे तड लावणे ही खरी पोलिसांची परीक्षा आहे. त्यांनी ती द्यावी व त्यात उत्तीर्ण होऊन दाखविताना हा सूर्य, हा जयद्रथचा फैसला करावा, ही अपेक्षा.
मध्यंतरी ‘टेरर ऑन व्हील्स’ या नावाचा थरारक, अॅक्शनपॅक्ड हॉलीवूड चित्रपट येऊन गेला. रस्त्यावरून धावणार्या वाहनांच्या पार्श्वभूमीवरील जीवघेणा थरार यात अत्यंत प्रभावीपणे दाखविला गेला आहे. प्रेक्षक त्यात गुंतून न पडले तरच नवल. आज अचानक या हॉलीवूडपटाची आठवण झाली याचे कारणही तसेच आहे. गेल्या काही महिन्यांपासून नाशिकमध्ये रस्त्यावरून गायब झालेल्या चारशे कोटींच्या कंटेनरच्या अशाच एका गुन्ह्याची चर्चा सुरू आहे. गेल्या आठवड्यातच या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सात संशयितांना इगतपुरी न्यायालयाने जामिनावर सोडले. जामिनाचे कारण देताना, न्यायालयाने असा काही प्रकार घडला असल्याचेच पुरावे सादर करता आले नसल्याचे सांगितल्याने चारशे कोटींचा कंटेनर लुटल्याचा प्रकार खरोखरच घडला की नाही याबाबतच आता संभ्रम निर्माण झाला आहे.
पोलिसांच्या मते, असा काही प्रकारच घडलेला नाही. फिर्यादी हा जे काही सांगतो त्याची संगती लागत नसल्याने तो मनोरुग्ण असावा, असाही कयास पोलीस खासगीत व्यक्त करतात. इगतपुरी न्यायालयाने या प्रकरणातील हवाच काढून घेतल्याने हा फुसका बार निघाल्याची चर्चा मात्र जोरात सुरू आहे. या चर्चेचा जोरही अनेक संशय निर्माण करणारा ठरतो आहे. कायदा हा पुराव्यावर आधारीतच भाष्य करीत असल्याने हे प्रकरण आता फाईलबंद होईल, अशी चिन्हे आहेत. परंतु त्यामुळे हे प्रकरण बंद जरी करायचे ठरविले तरी प्रत्यक्षात असंख्य प्रश्नांचे वादळ त्यातून उठणार आहे. मुळात, चारशे कोटींच्या जुन्या नोटांच्या कंटेनरचे अपहरण वा लूट झाल्याची घटना खरी की खोटी? फिर्यादी संदीप पाटील हे जे काही छातीठोकपणे सांगत आहे, तेदेखील जर खरे नसेल तर तो असे का सांगतो? फिर्यादीने सांगितलेली संशयितांची नावे आली कोठून? फिर्यादीवर विश्वास ठेवून पोलिसांनी ज्या संशयितांना अटक केली ते मग कशाच्या बळावर? फिर्यादी ज्या मुद्यांचा वारंवार उल्लेख करीत आहे, त्याचा अर्थ काय घ्यायचा व त्यातील सत्य आता मग कसे शोधणार? फिर्यादीने अलीकडेच तपासाधिकारी पोलीस अधिकार्यांनीच छळ केल्याची लेखी तक्रार नोंदविली आहे, त्याचे मर्म काय वा ते जर खोटे असेल तर त्याविरोधात अद्याप पोलिसांनीही कारवाई का केलेली नाही? या एकूणच प्रकरणात ठाण्यातील बिल्डर, एका राजकीय पक्षाचा बडा नेता तसेच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची नावे आलेली असल्याने हे प्रकरण हाय-प्रोफाईल सदरात मोडले गेले.
साहजिकच या प्रकरणातील सत्य शोधणे आता कोणाचे काम, मुळात कोट्यवधी रुपयांच्या जुन्या नोटांचा कंटेनर अपहरण झाला की नाही, याची तरी सत्यता पुढे येणार की नाही? फिर्यादी संदीप पाटील, हे प्रकरण जर सांगत आहे, आणि त्याचे पुरावे कोठेच नाही असे पोलीस म्हणतात तर या घटनेचे उगमस्थान नेमके काय? ते कोणी शोधायचे? अशा असंख्य प्रश्नांचे भेंडोळे निर्माण झाले आहे. त्याचा तपास आता कदाचित कधीच होणार नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या पोटातील उर्वरित महत्त्वाच्या काही प्रश्नांचीही तड कधीच लागणार नाही. गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात वाटपासाठी चाललेल्या चारशे कोटी रुपयांच्या कंटेनरची लूट झाल्याची सुरुवातीला माहिती पुढे आली. प्रकार घोटी पोलिसांच्या हद्दीत घडल्याची ही सुरुवातीची माहिती असल्याने हा जणू राष्ट्रीय भांडाफोड असल्यासारख्या बातम्या दूरचित्रवाणी वाहिन्यांनी दिल्या.
प्रकरणातील एकाचा ठाण्याशी संबंध असल्याचे जाहीर झाल्यानंतर राजकीय चर्चांना ऊत आला. त्यातून हे पैसे कोणाचे, कशासाठी चालले होते, मतदारांना वाटण्यासाठीच ते असतील अशा गावगप्पा रंगल्या. अधिक चौकशी केल्यानंतर त्या नोटा चलनात नसलेल्या म्हणजे नोटबंदीच्या काळात बंद करण्यात आलेल्या दोन हजार रुपये चलनाच्या असल्याचे पुढे आले. एका आश्रमात त्या नेल्या जात होत्या. त्यांच्याकडून या नोटा रिझर्व्ह बँकेतून बदलून दिल्या जाणार होत्या, अशीही भूमका उठली. एकूणच अत्यंत रहस्यमयरीत्या दररोज त्यासंदर्भात नवनव्या रंजक गोष्टी बाहेर येत गेल्या. त्या बाहेर कशा आल्या, त्यात तथ्य किती याबाबत कोणीही फारशी काळजी न घेताच त्या पुढे पुढे ढकलत राहिले. अनेकांनी तर जणू प्रत्यक्ष घटनास्थळी आपणच होतो, अशा आविर्भावात ही घटना सांगून परिणामकारकता वाढवून टाकली. समाज माध्यमावर तर अकलेचे असंख्य तारे तोडले गेले. परिणामी देशभरच्या माध्यमांना हा विषय चघळण्यास मिळाला. ‘असतील शिते तर जमतील भुते’ अशी एक म्हण मराठीत आहे.
येथे शिते आहेत असे समजून समग्र भुतावळ जमली. प्रत्यक्षात सगळेच भासमय. अर्थात याला भास म्हणावा की नाही याबाबतही स्पष्टता नाही. कारण कोणीतरी संदीप पाटील नावाची व्यक्ती आपल्याला आलेल्या एका भयावह प्रकाराची तक्रार करते. त्यातून सुरू होतो एका न संपणार्या प्रकरणाचा प्रारंभ. एखाद्या रहस्यमय चित्रपटात जसजशी कथा पुढे सरकत जाते आणि प्रत्येक वेळी नवनवा संशयित पुढे आणून प्रेक्षकांची उत्कंठा वाढविली जाते, तसेच काहीसे या प्रकरणात झाले. सुरुवातीच्या बातम्यांमध्ये घोटीत गुन्हा दाखल झालेला असल्याने हा कथित कंटेनर कसारा घाटातून आला वगैरे चर्चा झाल्या. त्या सर्वदूर पोहोचल्यानंतर अचानक कर्नाटक पोलिसांचा नाट्यमय प्रवेश झाला. फिर्यादीच्या कथनात हा प्रकार कर्नाटकातील चोरला या घाटात घडल्याचा उल्लेख असल्याने तेथील पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर साहजिकच त्यांनाही चौकशीचे सोपस्कार पार पाडावे लागले. त्यांच्याही मते असा काही कंटनेर आमच्या भागातून लुटला गेल्याबाबत काहीही नोंद नाही. एवढे सगळे होत असतानाही प्रत्यक्षात खरे काय झाले, कंटेनर कोठून पळविला गेला, तो कोणाच्या मालकीचा होता, त्यातील पैसे कोणाचे होते, ते कुठे चालले होते वगैरे प्रश्नांची उत्तरे आजही मिळत नाहीत.
संदीप पाटीलला या प्रकरणात काही जणांनी मारहाण करीत अपहरण केले, त्याच्याकडून या कथित चारशे कोटींच्या कंटेनरचा माग काढण्याचा प्रयत्न केला गेला, त्याने ठाण्यातील काहींची नावे घेतल्यानंतर त्यांनाही अटक झाली, असे केवळ तो सांगत नाही तर तशी फिर्यादही त्याने दिली आहे. त्यातील काही घटनांबाबत ठाण्यासह विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करा, ही फिर्यादीची विनंती मान्य झाली का, त्यात काय आढळले याबद्दलही काहीच खुलासा होत नाही. हे प्रकरण म्हणजे प्रश्नातून नवे प्रश्न निर्माण करणारे भलेमोठे प्रश्नकोडे (पझल) आहे. गंमत म्हणजे ना सत्ताधारी, ना विरोधकांनी या विषयावर काही भाष्य केले वा चौकशीची मागणी केली. अनेकांनी सवयीप्रमाणे अकलेचे तारे तोडून ठाण्यातील राजकीय नेत्याचे पैसे म्हटल्यावर ते कोणाचे असणार याची छातीठोकपणे माहिती सांगून त्यांना कोण अडकविण्याचा प्रकार करीत आहेत, याचाही खुलासा करून मोकळे झाले. सगळीच बोलाची कढी अन् बोलाचाच भात! फिर्यादी संदीप पाटील याने तर त्याच्या एका व्हिडिओमध्ये हे चारशे कोटी नसून प्रत्यक्षात हजार कोटी असल्याचाही बॉम्ब टाकला आहे. वाढता वाढता वाढे; पण कळता कळता न कळे असा हा प्रकार आहे.
पोलिसांच्या मते, ते या प्रकरणातील गुंतागुंतीच्या दावे-प्रतिदाव्यांमुळे पुरते गोंधळले आहेत. एखाद्या रहस्यमय चित्रपटाची कथादेखील मार खाईल असा हा प्रकार असल्याचे सध्यातरी दिसते आहे. इगतपुरी न्यायालयाने या सात जणांना जामीन दिला असला तरी या प्रकरणाचा तपास पुढे चालणार का, चालू ठेवल्यास त्याची दिशा काय असणार असे नवे प्रश्न आता पुढे आले आहेत. कारण प्रत्यक्षात कंटेनर लुटीची घटनाच जर घडलेली नाही अशा निष्कर्षापर्यंत काही यंत्रणा आल्या असतील तर तपास करायचा तरी कशासाठी आणि कोणासाठी, असेही प्रश्न पुढे येतात. त्याची उत्तरे शोधण्यासाठी मुळात संदीप पाटील याच्या फिर्यादीवर एकतर विश्वास ठेवावा लागेल किंवा ती सरसकट फेटाळून प्रकरण रफादफा करावे लागेल. समजा असे केले तर ज्या सात जणांना अटक केली होती, त्यांनी आपल्यावरील बेकायदा कारवाईवर आवाज उठविला तर पुढे काय हा प्रश्न उरतोच. त्याचमुळे ज्याला किमान सध्यातरी उत्तर नाही किंवा अंत नाही अशा या प्रकरणाची पारदर्शीपणे तड लावणे ही खरी पोलिसांची परीक्षा आहे. त्यांनी ही परीक्षा द्यावी व त्यात उत्तीर्ण होऊन दाखवितांना हा सूर्य, हा जयद्रथचा फैसला करावा, ही अपेक्षा.
.ही केवळ ‘कथा’ नाही, तर कदाचित ‘व्यथा’ आहे पारदर्शकतेच्या अभावाची, संस्थांवरील विश्वासाच्या कसोटीची आणि सत्य शोधण्याच्या संघर्षाची.
इथे एक मूलभूत प्रश्न उरतो. हा खरोखरच गुन्हा आहे का, की केवळ कल्पनारंजन? जर घटना घडलीच नसेल, तर अटक का? आणि जर घडली असेल, तर पुरावे कुठे? हा गोंधळ डर्हीीींंशी खीश्ररपव चित्रपटासारखा वाटतो. जिथे शेवटी प्रेक्षकच स्वतःला विचारतो : सत्य कोणते?
.राजकीय पक्षांचे मौनही लक्षणीय आहे. ना सत्ताधारी बोलले, ना विरोधक. जणू सगळ्यांनी पडदा खाली येण्याची वाट पाहायचे ठरवले आहे. पण हे प्रकरण ‘फुसका बार’ ठरले तरी त्यातून उभे राहिलेले प्रश्न मात्र जिवंतच राहतील.
.या कथेत राजकीय सावल्यादेखील आहेत. ठाण्यातील बिल्डर, राजकीय पक्षाचा नेता, वरिष्ठ पोलीस अधिकारी सगळी नावे चर्चेत. हा भाग ढहश वरीज्ञ घपळसहीं चित्रपटातील गॉथम शहरातील सत्ताकारणाची आठवण करून देतो. वरकरणी कायदा-सुव्यवस्था दिसते; पण पडद्यामागे सत्तेचे वेगळे खेळ सुरू असतात.
.राजकारण आणि गुन्हेगारी यांची सांगड घातली की वास्तवात कधी कधी चित्रपटांनाही लाजवेल अशी कथा तयार होते. नाशिक-ठाणे परिसरात गाजलेल्या कथित चारशे कोटींच्या कंटेनर लुटीचे प्रकरण हे जणू एखाद्या हॉलीवूड थ्रिलरची पटकथाच वाटावी असे आहे.
.सुरुवातीलाच आठवतो तो चरव चरु : र्ऋीीू ठेर हा चित्रपट. रस्त्यावरून धावणार्या वाहनांचा थरार, पाठलाग आणि गोंधळ. चारशे कोटींचा कंटेनर घाटातून गायब झाल्याची चर्चा सुरू झाली तेव्हा वातावरण काहीसे असेच तापलेले होते. कसारा घाट, चोरला घाट, कर्नाटक पोलीस, ठाणे कनेक्शन. प्रत्येक वळणावर नवा ट्विस्ट.
.या प्रकरणात फिर्यादी संदीप पाटील यांनी सांगितलेली कथा जणू ॠेपश ॠळीश्र या चित्रपटाची आठवण करून देते. सत्य काय आणि बनावट कथानक काय, याचा अंदाजच येऊ नये अशी गुंतागुंत. पोलिसांच्या मते घटना घडलेलीच नाही; पण फिर्यादी छातीठोकपणे लूट झाली असे सांगतो. मग प्रेक्षकांनी, म्हणजेच जनतेने नेमका कोणावर विश्वास ठेवायचा?
.(कथा (की व्यथा?) चारशे कोटींच्या घबाडाची या लेखाचे संक्षिप्त एआय रूपांतर)





