मुंबई | Mumbai
नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या उमेदवारांच्या माघारीनंतर प्रचारासाठी नेत्यांच्या तोफा धडाडण्यास सुरुवात झाली आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जालना तर एकनाथ शिंदे यांनी पालघर जिल्ह्यात आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. उद्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपच्या (BJP) उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. त्यातच शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये फोडाफोडीवरुन सुरु झालेला वाद चांगलाच पेटला आहे. अशातच आता शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० जिल्हा संपर्कप्रमुखांची घोषणा केली असून, या सर्वांना निवडणुका होईपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे निर्देश पक्ष नेतृत्वाने दिले आहेत. यामध्ये नाशिक लोकसभेच्या (Nashik Loksabha) संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी रामभाऊ रेपाळे आणि दिंडोरी लोकसभेच्या संपर्कप्रमुखपदाची रामभाऊ रेपाळे आणि भाऊसाहेब चौधरी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तर खासदार नरेश म्हस्के यांना ठाणे, नवी मुंबई आणि पुण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुखांची जिल्हा निहाय यादी
१) सिंधुदुर्ग – किरण पावसकर, राजेश मोरे
२) रत्नागिरी – यशवंत जाधव
३) रायगड ग्रामीण – संजय घाडी
४) नवी मुंबई शहर – नरेश म्हस्के
५) पालघर – रवींद्र फाटक
६) ठाणे ग्रामीण – प्रकाश पाटील
७) ठाणे शहर – नरेश म्हस्के
८) पुणे – नरेश म्हस्के
९) पिंपरी चिंचवड शहर – सिद्धेश कदम
१०) पुणे ग्रामीण – श्रीरंग आप्पा बारणे, रामभाऊ रेपाळे
११) सातारा – शरद कणसे
१२) सांगली – राजेश क्षीरसागर
१३) कोल्हापूर – धैर्यशील माने, संजय मंडलिक
१४) सोलापूर – संजय कदम
१५) नाशिक लोकसभा – रामभाऊ रेपाळे
१६) दिंडोरी लोकसभा – रामभाऊ रेपाळे,भाऊसाहेब चौधरी
१७) जळगाव – सुनिल चौधरी
१८) नंदुरबार – राजेंद्र गावित
१९) धुळे – मंजुळा गावित
२०) छत्रपती संभाजीनगर महानगर – विलास पारकर
२१) छत्रपती संभाजीनगर ग्रामीण – अर्जुन खोतकर
२२) जालना – अर्जुन खोतकर, भास्कर आंबेकर
२३) बीड – श्री. टी. पी मुंडे, मनोज शिंदे
२४) धाराशीव – राजन साळवी
२५) नांदेड – सिद्धराम म्हेत्रे
२६) लातूर – किशोर दराडे
२७) बुलढाणा – हेमंत पाटील
२८) परभणी – आनंद जाधव
२९) नागपूर ग्रामीण- दिपक सावंत
३०) नागपूर शहर – दिपक सावंत
३१) गडचिरोली – दिपक सावंत,किरण पांडव
३२) भंडारा – गोपीकिशन बाजोरिया
३३) अमरावती – नरेंद्र भोंडेकर
३४) वर्धा – राजेंद्र साप्ते
३५) यवतमाळ – हेमंत गोडसे
३६) वाशिम – जगदीश गुप्ता
३७) हिंगोली – हेमंत पाटील
३८) अकोला – अभिजित अडसूळ
३९) चंद्रपूर – किरण पांडव
४०) अहिल्यानगर -विजय चौघुले





