Monday, November 25, 2024
Homeनगरदोन दिवसांत 1340 मतदारांचे घरून मतदान

दोन दिवसांत 1340 मतदारांचे घरून मतदान

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर आणि शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाकडून दोन दिवस घेण्यात आलेल्या गृह मतदानात नगर लोकसभा मतदार संघातून 694 तर शिर्डी लोकसभा मतदार संघातून 646 अशा एकूण 1 हजार 340 ज्येष्ठ, दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीत 85 वयापेक्षा अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिक व 40 टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग (अपंगत्व) असलेल्या व्यक्तींना घरातूनच मतदान करता येणार आहे. नगर जिल्ह्यात 18 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान होम व्होटींगसाठी मतदारांनी बीएलओकडे अर्ज केले होते. यात जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांतून 1 हजार 449 मतदारांची नोंदणी झाली होती. यात नगरमधून 749 तर शिर्डीतून 700 मतदारांचा

समावेश होता. नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार (दि. 7) व बुधवार (दि. 8) अशा दोन दिवस गृह मतदान प्रक्रियेला पार पडली. पहिल्या दिवशी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील 364 तर नगर मतदारसंघातील 448 मतदारांनी घरून मतदान प्रक्रियेत सहभागी झाले होते. दुसर्‍या दिवशी बुधवारी (दि. 8) राबविलेल्या गेल्या मतदान प्रक्रियेत नगर लोकसभेसाठी 85 वयापेक्षा अधिक वय असलेल्या 196, दिव्यांग 49 व अत्यावश्यक सेवेतील एक अशा 246 व्यक्तीने मतदानाचा हक्क बजावला. दोन दिवसात 749 पैेकी 694 मतदारांनी मतदान केले आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघातून बुधवारी 85 वयापेक्षा अधिक वय असलेल्या 243, दिव्यांग 39 अशा 282 व्यक्तीने मतदानाचा हक्क बजावला. दोन दिवसात 700 पैकी 646 मतदारांनी मतदान केले आहे.

दरम्यान या दोनही दिवशी घरी न सापडणार्‍या अथवा रूग्णालयात दाखल असणार्‍या व्यक्तींसाठी पुन्हा आज गुरूवार (दि. 9 मे) रोजी विशेष मतदान प्रक्रिया (घरून) राबवण्यात येणार आहे. नोंदणी झालेल्यांपैकी 109 मतदारांचे मतदान होणे बाकी असून त्यासाठी आज प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या