Friday, May 3, 2024
HomeUncategorizedलोकसंख्या १६ लाख, वृक्षांची संख्या २ लाख ३८ हजार

लोकसंख्या १६ लाख, वृक्षांची संख्या २ लाख ३८ हजार

औरंगाबाद – aurangabad

सोळा लाख लोकसंख्येच्या औरंगाबाद शहरात केवळ २ लाख ३८ हजार झाडे असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्मार्ट सिटी (Smart City) डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने जीआयएस मॅपिंगच्या साह्याने मनपा क्षेत्रातील झाडांची गणना केली, त्यातून हा आकडा समोर आला आहे. लोकसंख्या आणि झाडांची संख्या यात मोठी तफावत असल्यामुळे शहर आरोग्यदायी राहण्यासाठी महापालिकेला (Municipality) येत्या काळात वृक्षारोपणावर मोठ्या प्रमाणात लक्ष द्यावे लागणार असून, लोकांचा सहभाग बाढवाबा लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

- Advertisement -

शहराचे क्षेत्रफळ १३९ चौरस असून अन्य भागांचा देखील यात समावेश आहे. प्रामुख्याने सातारा-देवळाई यासह महापालिका स्थापन होताना ज्या अठरा गावांचा समावेश शासनाने महापालिकेच्या हद्दीत केला, त्या गाबांचादेखील या क्षेत्रफळात समावेश आहे. येत्या काळात शहराचा असून, त्यामुळे क्षेत्रफळ देखील वाढणार आहे. शहराचे जेवढे क्षेत्रफळ आहे, त्याच्या तुलनेतझाडांची संख्या मात्र नगण्य असल्याची माहिती स्मार्ट सिटीकडून प्राप्त झाली आहे. शहराचे क्षेत्रफळ १३९ चौरस मीटर असून, लोकसंख्या किमान १६ लाखांच्या आसपास आहे. लोकसंख्येच्या तुलनेत केवळ २ लाख ३८ हजार झाडे असल्याचे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे.

३२ लाख झाडांची गरज 

झाडांची गणना करण्यासाठी स्मार्ट सिटीने जीआयएस मॅपिंगचा आधार घेतला. या यंत्रणेच्या माध्यमातून झाडांची गणना केल्यानंतर हा आकडा प्राप्त झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यात ५० हजार ते ७५ हजार झाडे अजून वाढू शकतात, म्हणजे तीन लाख झाडांचे शहर म्हणून औरंगाबादची ओळख प्रस्थापित केली जाऊ शकते.

- Advertisment -

ताज्या बातम्या