Friday, March 28, 2025
Homeब्रेकिंग न्यूजPune Porsche accident : बिल्डरपुत्राच्या चौकशीसाठी बाल हक्क मंडळाची पोलिसांना परवानगी; 'त्या'...

Pune Porsche accident : बिल्डरपुत्राच्या चौकशीसाठी बाल हक्क मंडळाची पोलिसांना परवानगी; ‘त्या’ प्रश्नांची उत्तरे मिळणार?

पुणे । प्रतिनिधी

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या चाैकशीची परवानगी बाल न्याय मंडळाकडून पोलिसांना मिळाली आहे. आज (शनिवार) पोलिस त्याची पालकांसमोर दोन तास चाैकशी करणार आहेत. अपघात झाला त्यावेळी गाडीत कोण होते? गाडी कोण चालवत होते? अपघाताच्यावेळी नेमकं काय झालं ? यासह अनेक प्रश्र्नांची उत्तरे पोलिसांना मिळण्याचा अंदाज आहे.

- Advertisement -

सद्या अल्पवयीन मुलगा बालसुधारगृहात असून, त्याचा मुक्काम पाच जुनपर्यंत तेथे आहे. चाैकशीच्यावेळी चाईल्ड प्रोटेक्शन आॅफिसर, तसेच मुलाचे पालक हे उपस्थित असणार आहेत. पालकांना उपस्थित राहणेबाबत पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.

१९ मे रोजी मध्यरात्री कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दोघा अभियंता मित्र-मैत्रीला उडवले होते. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. यावेळी अल्पवयीन मुलगा कार चालवत होता. पुढे त्याने पबमध्ये मद्यप्रानश केल्याचे समोर आले. दरम्यान याप्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यत तीन वेगळेगळे गुन्हे दाखल केल आहेत. त्यातील गुन्ह्यात मुलाचे बांधकाम व्यवसायिक वडील, आजोबा या दोघांना अटक करण्यता आली आहे.

तर मुलाचे वैद्यकीय चाचणीच्यावेळी ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने बदल्याप्रकरणी ससूनच्या दोघा डाॅक्टरांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या सर्वांची पोलिसांनी अपघाताच्या अनुषंगाने चाैकशी केली आहे. मात्र ज्याच्यामुळे हा अपघाताचा प्रकार घडला, त्याची थेट चाैकशी पोलिसांनी अद्यापर्यंत केलेली नाही. त्यामुळे आता मुलाच्या चाैकशीदरम्यान पोलिसांच्या तपासाची दिशा निश्र्चित होऊ शकते.

या प्रश्नांची मिळणार उत्तरे

मुलगा पार्टीला जाताना घरातून किती वाजता बाहेर पडला ? त्यावेळी गाडी कोण चालवत होते ? पार्टीसाठी मुलगा कोणत्या-कोणत्या पबमध्ये गेला ? तेथे त्यांनी कोणासोबत मद्यप्राशन केले ? पबमधून बाहेर पडल्यानंतर गाडी कोण चालवत होते ? त्याचबरोबर मुलाचे मित्र गाडीत कोण-कोण आणि कितीजण होते. अपघात नेमका कसा झाला ? गाडी कितीवेगाने धावत होती ? अपघातस्थळावर नेमक काय घडलं ? पोलिस कितीवेळाने तेथे आले. पोलिस ठाण्यात मुलाला किती वाजता घेऊन जाण्यात आले ? तसेच मुलाला पोलिसांनी बर्गर आणि पिझ्झा दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्याच्या चाैकशीत हे देखील स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

पोलिस ठाण्यात नेमकं काय घडलं ?

अपघातानंतर पोलिस मुलाला येरवडा पोलिस ठाण्यात घेऊन गेले. गुन्ह्यातून मुलाल वाचविण्यासाठी बिल्डर बापाने तेथूनच मोठी फिल्डिंग लावल्याचा आरोप आहे. त्यामुळे पोलिसांना कोणत्या लोकप्रतिनिधीने फोन केले होते का? तसेच गुन्हा दाखल करतेवेळी चालकावर दबाव टाकण्यात आला का ? चालकाला पोलिसांनी कोणत्या खोलीत बसवले, तेथे त्याच्याबरोबर कोण-कोण होते. मुलगा पोर्शे गाडी कधीपासून चालवत होता?

रक्त नमुने बदलाचे चित्र होऊ शकते स्पष्ट?

मुलाला वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात घेऊन आल्यानंतर तेथे त्याचे रक्त काढून घेतले. मात्र प्रत्यक्ष परिक्षणासाठी देताना दुसऱ्याचे रक्त देण्यात आले. ससूनच्या दोघा डाॅक्टारांनी हे कृत्य केले. दरम्यान मुलाला हे रक्त नमुने कोणी आणि कसे बदलले याबाबत माहिती आहे. त्यामुळे पोलिसांना त्याच्या चाैकशी ही माहिती मिळू शकते. तर वैद्यकीय चाचणीच्यावेळी त्याच्यासोबत घरातील व बाहेरील कोण-कोण व्यक्ती होत्या हे देखील समजू शकते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Thailand Earthquake: “पुल कोसळले, इमारती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या, अनेक लोक बेपत्ता...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiथायलंडची राजधानी बँकॉकमध्ये शुक्रवारी 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तीशाली भूकंप झाला. या शक्तीशाली भूकंपानंतर एकच हाहाकार उडाल्याचे पहायला मिळाले....