Friday, November 22, 2024
Homeदेश विदेशमोठी बातमी! NDA चे खातेवाटप जाहीर; कोणत्या मंत्र्यांकडे कुठली जबाबदारी?

मोठी बातमी! NDA चे खातेवाटप जाहीर; कोणत्या मंत्र्यांकडे कुठली जबाबदारी?

नवी दिल्ली | New Delhi

काल संध्याकाळी नरेंद्र मोदींनी (Narendra Modi)तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी शपथविधी सोहळ्याला परदेशी पाहुणे तसेच देशभरातील नामवंत व्यक्तींनी हजेरी लावली होती. मोदींसह एनडीएच्या एकूण ७२ खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. यामध्ये ३० कॅबिनेट मंत्री, ५ स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि ३६ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. त्यांनतर आज एनडीएचे (NDA) खातेवाटप जाहीर झाले आहे.

- Advertisement -

त्यानुसार, अमित शाह यांच्याकडे गृहमंत्रालयाची, राजनाथ सिंहाकडे संरक्षण मंत्रिपदाची, अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाची, एस जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाची तर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पुन्हा एकदा रस्ते वाहतूक व परिवहन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय गडकरी यांच्या खात्यात अजय टमटा आणि हर्ष मल्होत्रा यांना राज्यमंत्री करण्यात आले आहे.

तसेच मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज नेते शिवराज सिंह चौहान यांच्याकडे कृषी आणि शेतकरी कल्याण व पंचायत आणि ग्रामीण विकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर बिहारचे माजी मुख्यमंत्री जीताराम मांझी यांच्याकडे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (MSME) व शोभा करंदळे यांच्याकडे राज्यमंत्री (MSME) धुरा सोपविण्यात आली आहे. तर निर्मला सीतारामण यांच्याकडे वित्त मंत्रालय कायम ठेवण्यात आले आहे.

याशिवाय हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना ऊर्जा मंत्रालय देण्यात आले आहे. यासोबतच त्यांना नगरविकास मंत्रालयाचीही जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच, गोव्यातील नेते श्रीपाद नाईक यांची या खात्यांच्या राज्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तर भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांना आरोग्य मंत्रालय, धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण मंत्रालय, गजेंद्र सिंह शेखावत यांना कला पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालय, सीआर पाटील यांना जलशक्ती मंत्रालय, चिराग पासवान यांना क्रीडा व युवक मंत्रालय आणि टीडीपी नेते राममोहन नायडू यांच्याकडे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच पियुष गोयल, वाणिज्य, भूपेंद्र यादव, पर्यावरण व वने, राम मोहन नायडू, नागरी उड्डाण मंत्रालय, सर्वानंद सोनोवाल पोर्ट शिपिंग मंत्रालय, शांतनु ठाकुर, पोर्ट शिपिंग मंत्रालय, राज्यमंत्री, किरण रिजीजू यांच्याकडे संसदीय कार्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.  

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या