Sunday, May 26, 2024
Homeनाशिककांद्याची आवक घटणार!

कांद्याची आवक घटणार!

नाशिक । विजय गिते

सद्यस्थितीत कांद्यायला ५० रुपये प्रतिकिलो या दराने विकला जात आहे.कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाळी कांद्याचे पीक वाया गेल्याने यापुढे आवकेत कमालीची घट येणार आहे.

- Advertisement -

त्यामुळे दिवाळीपर्यंत हे दर दुप्पट होतील,अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी असलेल्या लासलगाव बाजार समितीत सद्यस्थितीत कांद्याला ४५०० रुपये इतका प्रतिक्विंटलला भाव मिळत आहे.याबरोबरच इतरही मार्केट कमिटीत तीन ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटलने कांदा विक्री होत आहे. गतवर्षी कांद्याला उच्चतम म्हणजेच पंधरा हजार रुपये प्रती क्विंटल दर मिळाले होते.

त्यानंतर सलग याही वर्षी कांद्याच्या दरात तेजी आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर जिल्ह्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून इतर राज्यात कांदा जात आहे. यंदा सलग पावसामुळे आंध्र प्रदेश, कर्नाटक व पश्चिम महाराष्ट्रातील पावसाळी ७५ टक्के कांदा रोपे जळाल्यामुळे कांद्याचे केवळ २५ टक्के उत्पादन होणार आहे.परिणामी इतरत्र कांद्याची निर्यात होणे अशक्य आहे

.त्यामुळे यंदा कांदा देशांतर्गतच पुरणार नाही,अशी परिस्थिती आहे. त्यामुळेच कादा टंचाईची शक्यता पाहता शासनाने निर्यातबंदी केली आहे. अफगाणिस्थानातून बोलावणार यावर्षी कांदा रोपवाटिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.त्यामुळे कांद्याच्या नियमित उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे यावर पर्याय म्हणून अफगानिस्थानातून कांदा आयात केला जाऊ शकतो. मात्र , तेथील एकच कांदा हा वजनाने अर्ध्या किलोहून जादा वजनाचा असतो.त्यामुळे हा कांदा केवळ खाणावळ , ढाबा, हॉटेलमध्येच वापरता येतो.

कांद्याची पावसाळी रोपे 75 टक्के जळाली आहेत. यंदा पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून येणारी आवक नगण्य राहण्याची शक्यता आहे. परिणामी डिसेंबरपर्यंत कांदा शंभरी गाठणार, हे निश्चित.

आनंदा गिते, कांदा व्यापारी, लासलगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या