Tuesday, February 3, 2026
HomeराजकीयPraful Patel : प्रफुल पटेलांनी घेतली पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांची भेट;...

Praful Patel : प्रफुल पटेलांनी घेतली पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांची भेट; बंद दाराआड चर्चा

दिल्ली । Delhi

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची स्वतंत्र भेट घेतली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला उधाण आले आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या खासदारांना संबोधित करण्यापूर्वी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांची भेट घेऊन त्यांच्याशी पाच ते सहा मिनिटे बंद दाराआड चर्चा केली. अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत केंद्रातील वरिष्ठ नेतृत्वाने हिरवा कंदील दिला असल्याची चर्चा होती. त्यामुळे पटेलांच्या या भेटीत विलीनीकरणाच्या ‘रोडमॅप’वर चर्चा झाली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.

YouTube video player

अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल? या प्रश्नावर सध्या तर्कवितर्क लढवले जात आहेत. सुरुवातीला प्रफुल पटेलांकडे ही सूत्रे जातील अशी शक्यता होती. मात्र, प्रफुल पटेल यांनी स्वतः यावर स्पष्टीकरण दिले आहे. “पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णय माझ्याशिवाय होईल,” असे विधान करून त्यांनी आपण या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या विधानामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोपवले जाईल, असे अप्रत्यक्ष संकेत मिळत आहेत.

राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर भाष्य करताना पटेलांनी सावध भूमिका घेतली. विलीनीकरणाबाबत सध्या कोणतीही चर्चा झालेली नाही, असे सांगत त्यांनी या विषयाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. पक्षाचे अंतर्गत निर्णय लोकशाही मार्गाने घेतले जातील, असेही त्यांनी नमूद केले. अजित पवारांच्या निधनानंतर केवळ तीन दिवसांत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावरून विरोधकांनी टीका केली होती.

यावर प्रफुल पटेलांनी सुनेत्रा पवारांची पाठराखण केली. “सुनेत्रा पवारांनी किती दिवस दुःख मानावे, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे,” असे म्हणत पटेलांनी टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. कठीण प्रसंगात पक्षाला स्थैर्य देण्यासाठी त्यांनी ही जबाबदारी स्वीकारल्याचे पटेलांनी अधोरेखित केले. पुढील काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक रचनेत मोठे बदल होण्याची शक्यता असून, दिल्लीतील या गाठीभेटींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा मिळण्याची चिन्हे आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Mayor : भाजपकडून महापौर, उपमहापौर पदासाठी नावे निश्चित झालेल्या आडके...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक महापालिकेच्या महापौरपदासाठी माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेविका हिमगौरी आडके (Himgauri Adke) आणि उपमहापौर पदासाठी माजी आमदार बाळसाहेब सानप...