Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik News : व्ही. एन. नाईक संस्थेवर 'प्रगती' चा झेंडा; अध्यक्षपदी कोंडाजीमामा...

Nashik News : व्ही. एन. नाईक संस्थेवर ‘प्रगती’ चा झेंडा; अध्यक्षपदी कोंडाजीमामा आव्हाड विजयी

सरचिटणीसपदी हेमंत धात्रक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यातील मविप्रनंतर (MVP) महत्वाची शैक्षणिक संस्था समजली जाणाऱ्या क्रांतीवीर व्ही एन नाईक शिक्षण संस्थेच्या (V.N.Naik Education Institute) पंचवार्षिक निवडणुकीत (Election) संमिश्र निकाल लागले आहेत. यात सर्वाधिक जागांवर तानाजी जायभावे व हेमंत धात्रक यांच्या नेतृत्त्वाखालील प्रगती पॅनलने (Pragati Panel) २९ पैकी २३ जागा जिंकल्या आहेत. तर कोंडाजीमामा आव्हाड यांच्या नेतृत्त्वातील परिवर्तन पॅनलने ६ जागांवर विजय मिळविला आहे.

- Advertisement -

या निवडणुकीत प्रगती पॅनलला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी मात्र, परिवर्तन पॅनलचे (Parivartan Panel) उमेदवार निवडून आले आहेत. यात अध्यक्षपदी कोंडाजीमामा आव्हाड व उपाध्यक्षपदी उदय घुगे यांनी बाजी मारली आहे. तर सरचिटणीसपदी हेमंत धात्रक आणि सहचिटणीसपदी दिगंबर गिते हे विजयी झाले आहेत.

हे देखील वाचा : संपादकीय : २९ जुलै २०२४ – दोषी कोण?

दुसरीकडे सत्ताधारी पंढरीनाथ थोरे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेलेल्या क्रांतिवीर पॅनल (Krantiveer Panel) आणि मनोज बुरकुले आणि अभिजीत दिघोळे यांच्या नव ऊर्जा पॅनलला या निवडणुकीत एकही जागा जिंकता आलेली नाही. तसेच या निवडणुकीत सत्ताधारी संचालक, अध्यक्ष यांच्यासह माजी आमदार बाळासाहेब सानप (Balasaheb Sanap) यांचा पराभव झाला आहे.

दरम्यान, या निवडणुकीत (Election) २९ जागांसाठी ११८ उमेदवार रिंगणात होते. तसेच यंदा प्रथमच चार पॅनलमध्ये निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी एकूण ८२ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे निकालाची उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर संस्थेचा निकाल जाहीर झाल्याने निकालाची (Result) उत्सुकता संपली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...