Saturday, October 5, 2024
Homeमुख्य बातम्याबच्चू कडूंना संताप अनावर; थेट अधिकाऱ्याच्याच लगावली कानशिलात

बच्चू कडूंना संताप अनावर; थेट अधिकाऱ्याच्याच लगावली कानशिलात

छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagar
प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू पुन्हा एकदा चर्चेत आले असून वादात सापडण्याची शक्यता आहेत. त्यांनी एका अधिकाऱ्याच्या कानशि‍लात लगावल्याचा प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना बच्चू कडू यांनी अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना आमदार बच्चू कडू यांनी अंध-अपंग बांधवांच्या समस्या ऐकून घेत प्रशासकीय व ई-रिक्षा कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी, त्यांनी कडूस्टाईलने एका अधिकाऱ्याला कानशि‍लात लगावली.

दिव्यांगाना दिलेले वाहन खराब असल्याने बच्चू कडू चांगलेच संतापले होते. त्यांनी अधिकाऱ्यांना तिथेच कानशि‍लात लगावली. छत्रपती संभाजीनगरच्या गेस्ट हाऊस मध्ये हा सर्व प्रकार घडला. बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना कानशि‍लात लगावल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, दिव्यांगाना निकृष्ट दर्जाचे ई रिक्षा वाटप करणार्‍या कंत्राटदार कंपनीच्या प्रतिनिधींनर बच्चू कडू चांगलेच संतापले होते. याविषयी विचारणा करताना त्यांचा पारा चढला आणि त्यांनी थेट त्या प्रतिनिधीवर हात उगारला. छत्रपती संभाजीनगरमध्ये अंध अपंग व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी समाजकल्याण विभागाकडून ई-रिक्षा देण्यात आल्या होत्या. मात्र, ज्या दिवशी या रिक्षा दिल्या, त्याच दिवशी त्या बंद पडल्या. या सगळ्या रिक्षा घेऊन अंध दिव्यांग व्यक्ती आमदार बच्चू कडू यांच्याकडे आले होते. त्यावेळी, बच्चू कडू यांनी संबंधितांना जाब विचारताना एका अधिकाऱ्यांना कानशि‍लात लगावल्याचे पाहायला मिळाले.

जर तुला काही माहितीच नाही तर इथे आला कशाला असा सवाल बच्चू कडू यांनी त्याला केला आणि या वेळेस उपस्थित सरकारी अधिकाऱ्यांनाही त्यांनी झापले , जवळपास ५०० रिक्षांचे वाटप करण्यात आलेय, पैकी २५० ते ३०० रिक्षा या खराब असल्याचे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे, कानाशिलात लगावलेला अधिकारी नाही तर कंपनीचा कर्मचारी होता असे कडू म्हणाले, या सगळ्या नादुरुस्त रिक्षा परत घ्याव्यात, असे कडू यांनी सांगितले, दरम्यान राज्य सरकार याबाबत चौकशी करेल असे दिव्यांग विभागाचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या