राहुरी । प्रतिनिधी
राहुरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत तनपुरे यांच्या विकास आघाडीने नगराध्यक्षपद व नगरसेवकपदाच्या 17 जागा जिंकून निर्विवाद बहुमत सिध्द केले आहे. तर भाजपाला अवघ्या सात जागा मिळाल्या असून विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार भाऊसाहेब मोरे यांनी भाजपाचे सुनील पवार यांचा 2 हजार 67 मतांनी पराभव केला.
नगराध्यक्षपदासाठी 5 तर नगरसेवक पदासाठी 90 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सकाळी राहुरी महाविद्यालयाच्या जिमखाना हॉल मध्ये मतमोजणीला सुरूवात झाली. पहिल्या फेरीत भाऊसाहेब मोरे यांना 1 हजार 239 मतांची आघाडी मिळाली.शेवटच्या फेरीपर्यंत ही आघाडी कायम राहिली.
नगराध्यक्षपदासाठी भाऊसाहेब छबुराव मोरे (विकास आघाडी 12,524 विजयी), सुनील ठकाजी पवार (भाजपा 10,457), गुलाब मोहन बर्डे (शिवसेना पुरस्कृत 529), बापुसाहेब भाऊसाहेब माळी (वंचित बहुजन आघाडी 221), सखाहरी शांताराम बर्डे (अपक्ष 175), नोटा- 203 अशी मते मिळाली. तसेच नगरसेवक पदासाठी प्रभाग क्र.1 (अ)- मयुरी सुधाकर जाधव (भाजपा 973), संगिता शहाजी जाधव (विकास आघाडी 1338, विजयी), नोटा- 27, प्रभाग क्र.1 (ब)- हर्ष अरूण तनपुरे (विकास आघाडी, 1353 विजयी), राहुल विजय जाधव (भाजपा 948), नोटा- 37, प्रभाग क्र. 2 (अ)- भारती विकास जगधने (भाजपा 448), लता बाळू जगधने (विकास आघाडी 947 विजयी), पुजा दत्तात्रय साठे (अपक्ष 46), नोटा- 13, प्रभाग क्र. 2 (ब)- प्रताप भाऊसाहेब गुंजाळ (36), केतन दशरथ पोपळघट (विकास आघाडी 819 विजयी), रविंद्र हिराचंद तनपुरे (शिवसेना पुरस्कृत 425), रविंद्र बाबुराव गुंजाळ (भाजपा 256), नोटा- 30 प्रभाग क्र. 3 (अ)- बाळासाहेब किसनराव गुलदगड (313), सचिन दिनकर मेहेत्रे (भाजपा 806), बबन कोंडीराम गुलदगड. (विकास आघाडी 888 विजयी), नोटा- 23, प्रभाग क्र.3 (ब)- प्रियंका सोमेश्वर तनपुरे (शिवसेना 195), प्रमिला उमेश शेळके (भाजपा 892), वृषाली नंदकुमार तनपुरे (विकास आघाडी 924 विजयी), नोटा- 19,
प्रभाग क्र. 4 (अ)- संदिप किसनराव रासकर (33), लक्ष्मीकांत संभाजीराव तनपुरे (489), नारायण नंदकुमार धोंगडे (भाजपा 469), प्रतीक रावसाहेब तनपुरे (विकास आघाडी, 1018 विजयी), संकेत प्रविण तनपुरे (शिवसेना 94), नोटा- 13, प्रभाग क्र.4 (ब)- रोशनी राम शिंदे (भाजपा 639), उषाताई प्रसाद तनपुरे (विकास आघाडी, 1410 विजयी), आयशा बाबुभाई इनामदार (वंचित बहुजन आघाडी 44), नोटा-23 प्रभाग क. 5 (अ)- रेणूका सचीन काशिद (विकास आघाडी 959), प्रियंका अमोल काशिद (भाजपा, 1173 विजयी), नोटा-38, प्रभाग क्र. 5 (ब)- गजानन भागवत सातभाई (विकास आघाडी, 1067 विजयी), प्रसाद राजेंद्र खैरे (भाजपा 930), अजय नानासाहेब चांदणे (वंचित बहुजन आघाडी 36), योगेश संजय सोलंकी (शिवसेना 52), गोपाल शांतीलाल अग्रवाल (अपक्ष 68), नोटा- 17,
प्रभाग क्र. 6 (अ)- सोनाली गुलाब बर्डे (शिवसेना पुरस्कृत 149), माधुरी अनिल माळी (विकास आघाडी 659), मनिषा संतोष बर्डे (भाजपा, 987 विजयी), नोटा- 34, प्रभाग क्र. 6 (ब)- चंद्रकांत गणपत उंडे (भाजपा, 978 विजयी), रोहित विजय नालकर (शिवसेना 111), संजीव सुधाकर उदावंत (विकास आघाडी 721), नोटा- 19.
प्रभाग क्र. 7 (अ)- सोन्याबापू वसंतराव जगधने (विकास आघाडी 1217 विजयी), संतोष राघुदास जगधने (भाजपा 790), नोटा-36, प्रभाग क्र. 7 (ब)- पूनम गंगाराम उंडे (शिवसेना 285), सिंधुबाई सुभाष डावखर (भाजपा, 892 विजयी), वैशाली महेंद्र शेटे (विकास आघाडी 813) नोटा- 53, प्रभाग क्र. 8 (अ)- गोपीनाथ गोरक्षनाथ मेढे (भाजपा 425), अविनाश सदाशिव म्हस्के (विकास आघाडी, 614 विजयी), नोटा- 17, प्रभाग क्र. 8(ब)- अर्चना रावसाहेब तनपुरे (भाजपा 434), स्मिता भारत भुजाडी (विकास आघाडी, 612 विजयी), नोटा- 10, प्रभाग क्र. 9(अ)- विलास तबाजी तनपुरे(680), सुजय राजेंद्र काळे (भाजपा 533), प्रशांत विजय डौले (विकास आघाडी 1056 विजयी), नोटा-10 प्रभाग क्र. 9(ब)- मनिषा सचिन भोंगळ (भाजपा, 1292 विजयी), सपना प्रकाश भुजाडी (विकास आघाडी 1025), तृप्ती ऋषिकेश तनपुरे (शिवसेना 67), नोटा- 15, प्रभाग क्र.10 (अ)- प्रसन्ना राजेंद्र वराळे (भाजपा, 905 विजयी), स्वप्नाली दिपक तनपुरे (विकास आघाडी 886), नोटा- 14 प्रभाग क्र. 10 (ब)- प्रदिप नानासाहेब भुजाडी (विकास आघाडी 1369) विजयी, दिनेश लुमाजी उंडे (भाजपा 417), नोटा-19 प्रभाग क्र. 11 (अ)- प्राजक्ता कमलाकर पठारे (भाजपा 668), प्रियंका रविंद्र आहेर (विकास आघाडी 1402 विजयी), अनिता रावसाहेब बोरूडे (शिवसेना पुरस्कृत 96), नोटा-20,
प्रभाग क्र. 11 (ब)- अक्षय रावसाहेब तनपुरे (भाजपा 1002), सागर सोमनाथ तनपुरे (विकास आघाडी 1157 विजयी), नोटा- 27, प्रभाग क्र.12 (अ)- निलेश दिनकर शिरसाठ (शिवसेना 263), अरूण मोहन साळवे (भाजपा, 1301 विजयी), दादु बाबुराव साळवे (विकास आघाडी 947), नोटा- 33, प्रभाग क्र.12 (ब)- सई शिवाजी सोनवणे (भाजपा 910), शालन दत्तू साळवे (वंचित बहुजन आघाडी 61), आस्मा अरिफ शेख (विकास आघाडी 1028 विजयी), अलमास अफनान आतार (अपक्ष 430), स्नेहा गौरव शेटे (शिवसेना 97), नोटा- 18.
दरम्यान, राहुरी शहरात काल विकास आघाडीच्या विजयाचा गल्लोगल्ली फटाके फाडून व गुलालाची मुक्त उधळण करत जल्लोष करण्यात आला.
राहुरीकरांनी तनपुरे कुटुंबांवर व विकास आघाडीवर विश्वास दाखवला. त्याबद्दल मी राहुरीकरांचे आभार मानतो. गेल्या चार वर्षांपासून नगरपरिषदेवर प्रशासक असल्याने विकास कामांबाबत अमेळ झाला. या चार वर्षात रखडलेला राहुरीचा विकास निश्चितच भरून काढण्यासाठी हे विजयी उमेद्वार प्रयत्न करतील.
– अरूण तनपुरे अध्यक्ष, डॉ. तनपुरे साखर कारखाना
गेल्या अनेक वर्षांपासून राहुरीकरांचा आमच्यावर विश्वास आहे. आम्ही मते मागील पंचवार्षिक मध्ये केलेल्या कामावर मागीतले. त्यामुळे आमच्यावर विश्वास टाकुन नगराध्यक्षपदाचे व इतर नगरसेवक पदाचे 17 उमेद्वार निवडून दिले. या विश्वासाला पात्र राहुन पुढिल पाच वर्षे हे सर्व विजयी उमेद्वार राहुरी शहराच्या विकासासाठी योगदान देतील, याचा मला विश्वास आहे.
– माजी मंत्री प्राजक्त तनपुरे




