अमरावती | Amravati
शासनाचा निधी हा परप्रांतीय नागरिकांवर खर्च होत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. त्यावर वंचीत बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निशाणा साधला असून ते म्हणाले, अशा लोकांवर सरकारने ताडा लावला पाहिजे. त्यांना कारागृहात टाकून मोकळे व्हायला पाहिजे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाराष्ट्रातला माणूस यूपीमध्ये आहे. ओडिशामध्ये आहे. महाराष्ट्रातील माणूस पश्चिम बंगालमध्ये आहे. मध्यप्रदेशात आहे. गुजरातमध्ये सुद्धा आहे त्यांचे काय करायचे? समाज दुभंगण्याची ही वक्तव्य आहेत, समाज दुभंगला की देश दुभंगतो. युएपीए आणि नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट यांच्यावर लागला पाहिजे. सरकारने हिंमत दाखवावी.
“अशा व्यक्तींना सरळसरळ टाडा लागला पाहिजे. सरकारने मागेपुढे न बघता अशांना आतमध्ये टाकून मोकळे झाले पाहिजे. त्यामुळे ही हिम्मत सरकारने दाखवावी. उद्या उठाव झाला या राज्याने म्हटले तुम जाव आणि तिकडच्या राज्याने म्हटले तुम जाव तर काय होणार?” असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.
राजकीय पक्ष्याचे नेते महाराष्ट्र दंगलीच्या उंबरठ्यावर असतांना देखील सामाजिक प्रश्नावर भूमिका घेत नाहीत. हे महाराष्ट्राचा दुर्दैव आहे असे मी मानतो. राजकीय नेते किती कमकुवत आहे हे यातून स्पष्ट होत आहे. आपल्या समाजाच्या बाजूने आहे की नाही हे सांगण्याची हिंमत या नेत्यात नाही अशी खंत यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलीय.
राज ठाकरे नेमके काय म्हणाले?
ठाणे, पुणे, नागपुरात ज्याप्रकारचे फ्लायओव्हर्स, ब्रीज आणि इतर सगळ्या गोष्टी मूळच्या लोकसंख्येसाठी नाही तर बाहेरुन येणाऱ्या लोकांसाठी होतात. म्हणजे बाहेरुन येणाऱ्या लोकांचा लोंढा किती मोठ्या प्रमाणात आहे. येथे या शहरात आल्यानंतर त्यांची व्यवस्था करण्यात सरकारचा इतका पैसा खर्च होतो. राज्यात इतक्या गोष्टी उपलब्ध असताना महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही. महाराष्ट्रातील मुला मुलींना आधी प्राधान्य द्या आणि उरल्या तर बाहेरच्यांना बोलवा असे मी आधीपासूनच सांगत आहे,” असे राज ठाकरे म्हणाले आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा