Friday, September 20, 2024
HomeनाशिकMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांचा मोठा डाव; 'या' नेत्याला दिली थेट...

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांचा मोठा डाव; ‘या’ नेत्याला दिली थेट तिसऱ्या आघाडीसाठी ऑफर

नाशिक | Nashik

- Advertisement -

आगामी विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरु आहे.दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांकडून विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections) तिसऱ्या आघाडीची चाचपणी केली जात आहे. अशातच आज नाशिक दौऱ्यावर असलेल्या प्रकाश आंबेडकरांनी थेट माकपच्या जे.पी. गावीत (JP Gavit) यांना तिसऱ्या आघाडीसाठी ऑफर दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

हे देखील वाचा :  काँग्रेसचे नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन

वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे आज नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) असताना त्यांनी आज पेसा भरती व्हावी, यासाठी गेल्या चार दिवसांपासून आदिवासी विकासभवन कार्यालयात आमरण उपोषणाला (Hunger Strike) बसलेले माकपचे माजी आमदार जे पी गावीत यांच्या आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी गावीत यांना तिसऱ्या आघाडीत सामील होण्याची ऑफर दिली. तसेच माकपचे काँग्रेसशी (Congress) लग्न झाले आहे, त्यामुळे त्यांचा काडीमोड होण्याची वाट पाहू, असे विधान करत प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीचे टेन्शन चांगलेच वाढवले आहे.

हे देखील वाचा : केंद्र सरकारची मोठी घोषणा! लडाखमध्ये होणार पाच नवीन जिल्हे; केंद्रीय गृहमंत्री शाहांची माहिती

तसेच आदिवासी समूहाच्या (Tribal Group) बजेटवर भाष्य करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की,”आदिवासी समूहाचे बजेट ७.५ टक्के आहे. एकंदरित त्यांचे बजेट ७० हजार कोटी होतात. त्यातून दहा हजार कोटी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ठेवले पाहिजे. दुर्दैवाने सरकारला अदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जाणीव नाही. कंत्राटदार चालले पाहिजे, यासाठी डीबीटी बंद करत नाहीत. बोगस आदिवासी भरती आहे, असे विधानसभेत सांगितले गेले. जे बोगस होते, त्यांना खुल्या प्रवर्गात समाविष्ट केले. पण पात्र आदिवासींची पेसा अंतर्गत भरती केली नाही”, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Nashik Rain Update : नाशकात पावसाची संततधार, तर त्र्यंबकला ‘जोर’धार; नागरिकांचे हाल

लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीकास्त्र

यंदाच्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने (Mahayuti Government) ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची मदत दिली जात आहे. यातील काही महिलांच्या खात्यात १४ ऑगस्टपासून पैसे जमा करण्यास सरकारने सुरुवात केली असून अनेक महिलांच्या खात्यात ३ हजार रुपये जमा झाले आहेत. त्यावरून आता प्रकाश आंबेडकरांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले की, लाडकी बहीण योजनेला पैसा कुठून आला? आदिवासींच्या बजेटचे ७ हजार कोटी लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग केले का? जर असे नाही तर सरकारने आदिवासींच्या बजेटचे विवरण द्यावे, असे आंबेडकरांनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या