Friday, November 22, 2024
Homeनगरप्रवरा, मुळा, गोदावरी आणि भीमेला पूर

प्रवरा, मुळा, गोदावरी आणि भीमेला पूर

अहमदनगर |प्रतिनिधी| Pravara

नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा, मुळा, कुकडी, दारणा, गंगापूर धरणांच्या पाणलोटात गत काही दिवसांपासून धुव्वादार पाऊस होत असल्याने बहुतांश धरणं ओव्हरफ्लो झाली असून प्रवरा, मुळा, गोदावरी, भीमा, घोड, कुकडी या नद्यांना पूर आले आहेत. अद्याप पाऊस सुरू असल्याने या सर्व नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. या सर्व नद्यांना पूर आल्याचे चित्र प्रथमच पहावयास मिळत आहे. तसेच जायकवाडी धरणाकडे नाशिक, नगर जिल्ह्यातून पाणी मोठ्या प्रमाणात झेपावल्याने या धरणातील पाणीसाठा वेगाने वाढणार आहे. नद्या भरभरून वाहत असले तरी अन्य नगर जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.

- Advertisement -

भंडारदरा धरणातील पाणीसाठा 10626 दलघफू (96.26 टक्के) कायम ठेवून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी काल सायंकाळी भंडारदरा धरणातून 25 हजार 394 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर त्या पाठोपाठ निळवंडे धरणाचा साठा देखील 90 टक्क्यांवर आल्याने धरणातून प्रवरा नदीपात्रात 30775 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे अकोले, संगमनेर, कोल्हार, बेलापूर वाहणार्‍या या नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठी सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. मुळा धरणातील पाणीसाठा 76 टक्के झाला आहे. गोदावरीतूनही 54233 क्युसेकने पाणी वाहत आहे. या वर्षी पहिल्यांदाच नगर जिल्ह्यातील धरणांतून जायकवाडी धरणाकडे पाणी झेपावलंय.

प्रवरा 30775 क्युसेक

मुळा 30125 क्युसेक

गोदावरी 54233 क्युसेक

भीमा 98675 क्युसेक

आढळा 4070 क्युसेक

घोड 18000 क्युसेक

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या