Friday, March 28, 2025
Homeनगरप्रवरा नदी पात्रात दोन युवक बुडाले

प्रवरा नदी पात्रात दोन युवक बुडाले

एकाचा मृतदेह आढळला तर दुसर्‍याचा शोध सुरू

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले (Akole) तालुक्यातील सुगाव येथील रोपवाटीके जवळील प्रवरा नदी (Pravara River) पात्रात दोन युवक बुडून मयत (Youths Drowned Death) झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. अकोले तालुक्यातील सुगाव येथे हे युवक मुरघास बनविण्यासाठी धुमाळ वस्तीवर आले होते. उष्णतेमुळे सदर युवक सागर पोपट जेडगुले (वय 25 रा. धुळवड ता. सिन्नर) तर अर्जुन रामदास जेडगुले (वय 18 रा. पेमगिरी, ता. संगमनेर) हे प्रवरा पाञातील पाझर तलावाजवळ आंघोळीसाठी पाण्यात उतरले असता त्यांना पाझर तलावाच्या पडणार्‍या पाण्याच्या दाबाचा व पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने या दोघेही मयत झाले आहेत.

- Advertisement -

सागर जेडगुले याचा मृतदेह (Dead Body) हाती लागला असुन अकोले ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे तर अर्जुन याचा मृतदेहाचा शोध चालु असुन स्थानिक ग्रामस्थ व नातेवाईक यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. मात्र, बराच वेळ झाल्यानंतर प्रांताधिकारी यांनी मृतदेह सापडत नसल्याने रेस्युक्यु टीमला रवाना करत मदत पोहचवली आहे. यावेळी अकोले पोलिस स्टेशनचे कर्मचारी, कामगार तलाठी,पोलिस पाटील व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Immigration and Foreigners Bill 2025: भारत देश धर्मशाळा नाही! इथे अशांतता...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiकोणीही वाटेल तेव्हा भारतात येऊन राहायला, हा देश धर्मशाळा नाही. व्यापार, शिक्षण व संशोधनासाठी येणाऱ्या लोकांचे स्वागत आहे. मात्र,...