Thursday, January 8, 2026
Homeनगरप्रवरा नदीपात्रातील पाण्यात मामा भाच्याचा बुडून मृत्यू

प्रवरा नदीपात्रातील पाण्यात मामा भाच्याचा बुडून मृत्यू

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

अंघोळीसाठी गेलेल्या मामा भाचे यांचा प्रवरा नदीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना पाचेगाव ता.नेवासा येथे गुरुवारी दि.21 नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या वाजेच्या सुमारास घडली आहे.

- Advertisement -

किरण सुरेश देठे (वय 28 रा.पाचेगाव ता. नेवासा) व त्यांचा भाचा अनुज प्रवीण भालेराव (वय 10 रा. खोसपुरी ता नगर) असे बुडून मृत्यू झालेल्या मामा भाच्याचे नाव आहे अनुज भालेराव हा नुकताच आपल्या आई वडीलासोबत मामाच्या गावाला दिवाळी सणासाठी आलेला होता. एकुलता एक मुलगा बुडून मृत्यू पावल्याने घटनास्थळी आई वडिलांनी मोठा हंबरडा फोडला.

YouTube video player

स्थानिक युवकांनी दोन्ही मृतदेह नदीपात्रातुच्या पाण्यातुन बाहेर काढले. मृतदेह उच्चस्तरीय तपासणीसाठी नेवासा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्याला माहिती कळविण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : ८ जानेवारी २०२६ – शहाणे होण्याची गरज

0
जनतेला आता राजकारण्यांची, नेत्यांची कमाल वाटायला लागली असेल. चेहर्‍यावर सोयीनुसार वेगवेगळे मुखवटे चढवायचे. तोच खरा चेहरा असल्याचे भासवायचे. गरज पडली तर मुखवट्याचे रंगही बदलायचे....