Wednesday, June 26, 2024
Homeनंदुरबारनंदुरबारात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

नंदुरबारात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

- Advertisement -

शहरासह जिल्ह्यात आज सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने सुमारे अर्धातास जोरदार हजेरी लावली. शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे.

कधी कडक ऊन तर कधी ढगाळ वातावरण अशी स्थिती आहे. गेल्या आठवड्यात नंदुरबार व शहादा तसेच धडगाव तालुक्यातील काही भागात वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

अनेकांच्या घरांची छते, शेती पिकांचेही नुकसान झाले तर झाडे उन्मळून पडली आहेत. आज दि. 3 जून रोजी सकाळपासून ऊन-सावलीचा लपंडाव सुरु होता. वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. नागरिक उकाड्याने हैराण झाले होते.

सायंकाळी 6.30 च्या सुमारास अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. अर्धा तास मुसळधार पावसाने झोडपून काढले. मान्सूनपूर्व पावसामुळे खरिपाच्या शेतीकामांना वेग येणार आहे. शेतकर्‍यांकडून लागवडीची पूर्वतयारी करण्यात आली आहे.

काही शेतकर्‍यांनी मे महिन्यातच कापसाची लागवड केल्याने आज झालेल्या मान्सूनपूर्व पावसाचा शेतकर्‍यांना लाभ होणार आहे. शेतकर्‍यांकडून खरिपाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून आता मान्सूनची प्रतिक्षा लागली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या