Monday, May 27, 2024
Homeनगरदरोड्याच्या तयारीतील निमगाव खैरीचे चार गुन्हेगार जेरबंद; एक पसार

दरोड्याच्या तयारीतील निमगाव खैरीचे चार गुन्हेगार जेरबंद; एक पसार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

एका पांढर्‍या रंगाच्या कारमधून श्रीरामपूरहून बाभळेश्रकडे रस्ता लूट करून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या

- Advertisement -

तालुक्यातील निमगाव खैरी येथील पाच सराईत गुन्हेगारांना श्रीरामपूर शहर पोलिसांनी श्रीरामपूर एसटी वर्कशॉपजवळ सापळा रचून अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन तलवारी, एक हुंदाई कार तसेच मोबाईल, मिरची पावडर, दोरी, लोखंडी टामी व अन्य साहित्य हस्तगत केले.

श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीहरि बहिरट यांना खंडाळा या भागातून काही गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलीस पथकाने श्रीरामपूर एस. टी. कार्यशाळेजवळ सापळा लावला.

सदरचे गुन्हेगार हे पांढर्‍या रंगाच्या ह्युंदाई कारमधून श्रीरामपूरहून बाभळेश्वरकडे रस्ता लूट करून दरोडा टाकण्याच्या तयारीत जात असताना पोलिसांनी या कारला हात दाखवून थांबवले. गाडीचा वेग कमी होत असताना ड्रायव्हरच्या पाठीमागे बसलेला एकजण दरवाजा उघडून पळून गेला.

यावेळी पोलीस कॉन्स्टेबल कारखेले व पोलीस कॉन्स्टेबल दिघे यांनी पाठलाग केला परंतु सदरचा गुन्हेगार हा वर्कशॉपच्या भितींवरून उडी मारून पळून गेला. गाडीतील अन्य चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यात विक्रम उर्फ विकी नारायणसिंग परदेशी (वय 30), प्रसाद भाऊसाहेब वदक (वय25), प्रशांत साईनाथ लेकूरवाळे (वय 25), सागर अण्णासाहेब दुशिंग (वय 30), तसेच पळून गेलेल्याचे नाव विचारले असता भक्ती काळे (सर्व रा. निमगाव खैरी) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी त्यांची तपासणी केली असून त्यांच्याकडून ह्युंदाई कार नं. एमएच 12, के. एन. 7841 या गाडीत असलेल्या दोन तलवारी, मिरची पूड, पांढर्‍या रंगाची सुती दोरी, लोखंडी टामी, तीन मोबाईल असा एकूण 1 लाख 49 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल किशोर सुभाष जाधव यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. 1922/2020 प्रमाणे विक्रम उर्फ विकी नारायणसिंग परदेशी (वय 30), प्रसाद भाऊसाहेब वदक (वय25), प्रशात साइनाथ लेकूरवाळे (वय 25), सागर अण्णासाहेब दुशिंग (वय 30), तसेच पळून गेलेल्या भक्ती काळे यांचेविरुध्द भादंवि कलम 399, 402, सह आर्म अ‍ॅक्ट 4/25 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या