धुळे dhule। प्रतिनिधी
नव्वद दिवसांच्या (ninety day programs) कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त गुणांकन (Maximum score) महापालिकेला (Municipal Corporation) मिळेल यासाठी ठोस उपाययोजना करण्याबाबत कृती आराखडा (Action plan) तयार करण्यासाठी व आरोग्य विभागाच्या (Health Department) विविध समस्यांबाबत व शासकीय योजनांबाबत (government schemes)आयुक्त देविदास टेकाळे (Commissioner Devidas Tekale) यांच्या उपस्थितीत बैठक (meeting) आयुक्तांच्या निवासस्थानी घेण्यात आली. यावेळी उपायुक्त विजय सनेर हे उपस्थित होते.
शासनाच्या निर्णयाप्रमाणे शहरातील विविध उपक्रम राबवणे स्पर्धात्मक परीक्षाच्या दृष्टिकोनातून दिलेल्या मार्गदर्शक विषयांवरती अॅक्शन प्लॅन तसेच करावयाचे उपायोजना बाबतीत चर्चा या बैठकीत झाली. प्लास्टिक बंदी व कचरा संकलन याबाबत कृती आराखडा निश्चित करण्यात आला. घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकास समुपदेशन करून त्यांच्या घरातील ओला कचरा त्यांनीच कंपोस्ट करावा व फक्त सुका कचरा महापालिकेने घ्यावा याबाबत संबंधितांना आवश्यक ते आदेश देण्यात आलेले असून नागरिकांमध्ये याबाबत प्रबोधन तथा जनजागृती करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच प्लॅस्टिक बंदी बाबत महापालिका आता दंडात्मक कारवाई सोबतच व्यापार्यांवरती व स्वच्छता विषयक गैरवर्तन करणार्या नागरिकांवर शासन निर्देशाप्रमाणे गुन्हे व दंडात्मक कार्यवाही करण्याबाबत स्वच्छता निरीक्षक यांना आदेश देण्यात आले आहेत. तसेच यापुढे प्लास्टिक बंदी बाबत कडक उपाययोजना करण्यात येणार आहे. मनपाच्या कर्मचार्यांना याबाबत शासनाच्या आदेशाप्रमाणे प्रशिक्षण देण्यात येणार असून दंडात्मक कारवाई करण्याबद्दल निश्चित करण्यात आले आहे. याबाबतीत येणार्या महापालिकेच्या सभेमध्ये एक सादरीकरण करून महासभेला अवगत करण्यात येणार आहे. यात नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनाही या उपक्रमाबाबत माहिती देण्यात येणार आहे. त्यांच्या सहकार्याने सदर कार्यवाही करणार आहे. माता सुरक्षित व घर सुरक्षित या अभियान यशस्वी व प्रभावीपणे राबविण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. नव्वद दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त महापालिकेला गुणांकन मिळेल यासाठी ठोस उपाययोजना करण्याबाबत कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
या बैठकीस उपायुक्त विजय सनेर, मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, लक्ष्मण पाटील, चंद्रकांत जाधव, कनिष्ठ अभियंता प्रदीप चव्हाण, मलेरिया पर्यवेक्षक विकास साळवे व सर्व स्वच्छता निरीक्षक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.