Saturday, July 27, 2024
Homeनाशिकमनमाडला पावसाची जोरदार हजेरी

मनमाडला पावसाची जोरदार हजेरी

मनमाड । प्रतिनिधी Manmad

अखेर दोन महिन्याच्या प्रदीर्घ विश्रांती नंतर आज(मंगळवार) सायंकाळी 7 वाजे नंतर मनमाड शहर परिसरात पावसाचे जोरदार आगमन झाले.सुरुवातीला पावसाच्या हलक्या सरी बरसल्या मात्र त्यानंतर पावसाचा जोर वाढला आणि 8 वाजे पर्यंत एक तास मुसळधार पावसाने शहर परिसराला झोडपून काढले.

- Advertisement -

पावसाला सुरुवात होताच नेहमी प्रमाणे वीज पुरवठा खंडित झाला होता त्यामुळे संपूर्ण शहर अंधारात बुडाले होते.पावसाने अचानक येऊन सर्वाना सुखद धक्का दिला. जोरदार पाऊस सुरु झाल्यामुळे बाजार पेठेत आलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. पावसामुळे करपू लागलेल्या पिकांना जीवदान मिळणार असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना देखील दिलासा मिळाला आहे.

पावसाळा सुरु झाल्यानंतर सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावली होती मात्र त्यानंतर पाऊस गायब झाला होता त्यामुळे पिके करूप लागल्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांवर आले होते. शिवाय चारा पाण्याचा प्रश्न देखील गंभीर झालेला आहे.मात्र तब्बल दोन महिन्या नंतर शहर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली एक तासा पेक्षा जास्त वेळ पाऊस झाला असल्यामुळे करपू लागलेल्या पिकांना जीवदान मिळाले तर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना देखील दिलासा मिळाला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

असें असले तरी नदी, नाले अद्यापही कोरडे असून विहिरीनी देखील तळ गाठलेला आहे त्यामुळे आगामी काळात सलग जोरदार पाऊस होणे अत्यंत गरजे आहे तरच चारा,पाणी टंचाई दूर होईल. दोन महिने पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगाम एका प्रकारे शेतकर्‍यांच्या हातातून निघून गेला आहे मात्र सलग जोरदार पाऊस झाल्यास किमान रब्बीचा हंगाम तरी व्यवस्थित होईल असें मत शेकार्‍यांनी व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या