Saturday, July 27, 2024
Homeनगरसाडे तीन हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

साडे तीन हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

उद्या (गुरूवारी) अनंत चतुर्दशीच्या दिवशी जिल्हाभरात विसर्जन मिरवणूक पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने तब्बल 3524 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. यात 26 ते 28 सप्टेंबर असे तीन दिवस 596 जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रशासनाने दिली.

- Advertisement -

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात उत्साहाचे वातावरण आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान राजकीय शक्ती प्रदर्शनही मोठ्या प्रमाणात होणार आहे. यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कलम 107 अंतर्गत 805 जणांवर, कलम 110 अंतर्गत 135 जणांवर, 151 (3) अंतर्गत एकावर, कलम 144(2) अंतर्गत 596 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच कलम 149 अंतर्गत तब्बल 1877 जणांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आली आहे.

तसेच मुंबई दारू विक्री प्रतिबंधक कायद्यानुसार 41 दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत फ्लेक्स लावणार्‍या 42 जणांवर कारवाई केली आहे. याशिवाय 3 सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली असून नऊ टोळ्यांतील 24 गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. जिल्ह्याबाहेरून अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. प्रमुख शहरात मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या