Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रमहागाईचा भडका! फळभाज्या-पालेभाज्यांचे दर कडाडले

महागाईचा भडका! फळभाज्या-पालेभाज्यांचे दर कडाडले

मुंबई । Mumbai

एकीकडे देशासह राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) कमी झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता. मात्र आता दुसरीकडे फळभाज्या व पालेभाज्यांच्या किंमती (vegetables Prices) वाढल्याने सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईचा (Inflation) सामना करावा लागत आहे.

- Advertisement -

यामध्ये मेथीची जुडी ३० ते ४० रुपयांना मिळत आहे. तर कोथिंबीरची जुडी ५० ते ६० रुपयांना मिळत आहे. तसेच कांदापात १५ रुपये, पालक १० रुपये शेपू २० रुपयांना मिळत आहे. तर दुसरीकडे कांद्याचे दर घसरल्याने कांदा (Onion) १५ ते २० रूपये किलोने विकला जात आहे.

तसेच फळ भाज्यांमध्ये टोमॅटोचे (tomatoes) भाव किलोमागे ८० ते १०० रुपयांच्या घरात गेले आहेत. तर हिरवी मिरचीचे (Green chillies) भाव देखील गगनाला भिडेल असून ५० ते ६० रुपये किलोने विकली जात आहे. तसेच भेंडी ३० रुपये, वांगी २५, बटाटे (Potatoes) २५ ते ३० रुपये, दोडका २० रुपये, शेवगा ३० रुपये, कारली १५ रुपये किलोने विकले जात आहेत.

तर फ्लॉवरच्या (Cauliflowe) एका गड्ड्याची किंमत २० ते २५ रुपये झाली असून कोबीच्या एका गड्ड्याची किंमत १० ते १५ रुपये इतकी आहे. दरम्यान फळभाज्या व पालेभाज्यांचा हा वाढता आकडा लक्षात घेता सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचा चांगलाच चटका बसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या