Monday, May 20, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार जि.प.चे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.राहूल चौधरी यांचा पदभार काढण्याचा ठराव

नंदुरबार जि.प.चे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.राहूल चौधरी यांचा पदभार काढण्याचा ठराव

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

सभागृहात नेहमीच उडवाउडवीची उत्तरे देणे, मुद्देसूदपणे सभागृहात माहिती न देण्यास यासह नेहमीच वादग्रस्त Controversial ठरणार्‍या प्राथमिक विभागाच्या प्रभारी शिक्षणाधिकारी Primary Education Officer डॉ.राहूल चौधरी Dr. Rahul Chaudhary यांचा पदभार काढून घेण्याचा लेखी ठराव Resolution जिल्हा परिषदेच्या Zilla Parishad स्थायी समितीच्या Standing Committee सभेत करण्यात आला. यापुर्वीही डॉ.चौधरी यांचा पदभार काढून घेण्याबाबत अनेकदा सभागृहात चर्चा झाली आहे. परंतू आज प्रथमच लेखी ठराव करण्यात आला.

- Advertisement -

जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा अध्यक्षा ऍड.सीमा वळवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी व्यासपिठावर जि.प.उपाध्यक्ष ऍड.राम रघुवंशी, सभापती रतन पाडवी, गणेश पराडके, अजित नाईक, निर्मला राऊत, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ उपस्थित होते.

यावेळी विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर शाळा सुरु झाल्या असल्या तरी शाळांमध्ये इ.१लीतील विद्यार्थ्यांची समाधानकारक संख्या नसल्याने येत्या कालावधीत शाळा बंद पडतील असे जि.प.सदस्य देवमन पवार यांनी सांगितले.

काळंबा येथील शाळेत अवघे ६ विद्यार्थी असल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. प्राथमिक विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी डॉ.राहूल चौधरी हे नेहमीच वादग्रस्त राहिले आहेत. सभागृहात ते कधीही समाधानकारक उत्तर देत नाही, उडवाउडवीची उत्तरे देतात,

सभागृहाची दिशाभूल करता त्यामुळे त्यांच्याकडी पदभार काढून घेण्यात यावा, अशी मागणी जि.प.सदस्य देवमन पवार, सी.के.पाडवी यांनी केली. त्यांना जि.प.सदस्य भरत गावित यांनीही दुजोरा दिला. सभापती रतन पाडवी यांनीदेखील पदभार काढून घेण्याचे सूचित केले.

त्यामुळे डॉ.चौधरी यांचा प्रभारी शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार काढून घेण्याचा लेखी ठराव यावेळी करण्यात आला. आतापर्यंत अनेकदा डॉ.चौधरी यांचा पदभार काढून घेण्याबाबत प्रश्‍न उपस्थित करण्यात आले होते.

परंतू प्रत्यक्षात कारवाइ करण्यात आली नव्हती. आज प्रथमच लेखी ठराव करण्यात आला. त्यामुळे आता डॉ.चौधरी यांचा पदभार काढून दुसर्‍या अधिकार्‍यांकडे सोपविण्यात येणार आहे.

यावेळी जि.प.सदस्य भरत गावित यांनीही प्राथमिक शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.जि.प.मध्ये विविध विभागांच्या अधिकार्‍यांमध्ये समन्वय नसल्याने कामे वेळेवर होत नाहीत.

फक्त चालढकल केली जाते. प्रत्येकवेळी सभेत पदाधिकार्‍यांकडून कोणत्याही प्रश्नांची विचारणा झाल्यावर माहिती घेतो, सांगतो, करतो अशी उत्तरे अधिकार्‍यांकडून दिली जात असली तरी प्रत्यक्षात मात्र याबाबत कोणतेही गांभीर्य न पाळता काम केली जात नाहीत.

यावर जि.प.अध्यक्षा ऍड.सीमा वळवी व उपाध्यक्ष ड.राम रघुवंशी यांनी सूचना देत प्रत्येक अधिकार्‍याकडे आपापल्या विभागाबाबत माहिती असणे गरजेचे आहे. जि.प.मध्ये काम करणार्‍या अधिकार्‍यांची गरज आहे.

पाहिजे त्या प्रमाणात प्रभावी कामे होत नसल्याने जि.प.चे नाव खराब होत आहे. सन २०१६-१७ पासूनचे काही कामे पेंडींग आहेत तर गतिमानता येणार कशी? असा सवाल ऍड.राम रघुवंशी यांनी उपस्थित केला.

त्यामुळे सर्व विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागाशी समन्वय साधून कामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जि.प.च्या विविध विभागात एकच फाईल त्रृटी पूर्ण झाल्यावर देखील अनेकदा फिरत असल्याने याबाबत शंका उपस्थित होते.

पंचायत राज समितीच्या दौर्‍याप्रसंगी तसेच लाच प्रकरणी झालेल्या कारवाईत जि.प.ची इभ्रत वेशीवर टांगली गेली होती. मात्र किमान आतातरी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावून जि.प.ची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न करा, अशी अपेक्षा जि.प.पदाधिकार्‍यांकडून व्यक्त करण्यात आली.

यापुढे कामांमध्ये दिरंगाई झाल्यास खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार यांनी दिल्या.

दरम्यान, लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जिल्हा आरोग्याधिकारी महेंद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले. जलव्यवस्थापन समितीचा आढावा सादर करीत असतांना तिनसमाळ येथे पाणी पोहचल्याचा उल्लेख संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी केल्यावर सभापती रतन पाडवी यांनी प्रत्यक्ष जावून पाहणी करा,

अंदाजित बोलून खोटी माहिती सभागृहासमोर देवू नका, असे खडेबोल सुनावले. जि.प.सदस्य भरत गावित यांनी मेडीकलच्या फाईली लवकर क्लिअर होत नसल्याने अनेकांना फिरफिर करावी लागते. यामुळे असे न करता आपल्याच कर्मचार्‍यांना वेठीस धरु नका, असे सांगितले. रोजगार हमी योजनेची जिल्ह्यात सुमारे १८०० कामे सुरु असून त्यावर साडेसहा हजार मजूरांना काम मिळाल्याची माहिती यावेळी संबंधित विभागाकडून देण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या