Saturday, January 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्या उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्या उद्घाटन

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन उद्या, बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. याशिवाय मुंबई मेट्रो लाईन-३ च्या अंतिम टप्प्याचे आणि ‘मुंबई वन’ या देशातील पहिल्या एकात्मिक कॉमन मोबिलिटी अ‍ॅपचे लोकार्पण मोदींच्या हस्ते केले जाणार आहे.

YouTube video player

पहिल्या टप्प्यात १९ हजार ६४७ कोटींची गुंतवणूक असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उदघाटनासाठी नरेंद्र मोदी उद्या मुंबईत येत आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे दुपारी तीन वाजता उदघाटन सोहळा होईल. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापु नायडू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार श्रीकांत बारणे आदी उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, यावेळी राज्यातील ४१९ आयटीआय आणि १४१ तांत्रिक संस्थांमध्ये २ हजार ५०६ बॅचेसच्या माध्यमातून नवीन अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम या उपक्रमाची सुरुवात नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’चे दिमाखदार उद्घाटन

0
नाशिक | प्रतिनिधी Nasik नाशिकमधील घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणाऱ्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चे आज (दि. २३ जानेवारी) उत्साही...