Saturday, September 28, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द; 'हे' आहे कारण

मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द; ‘हे’ आहे कारण

पुणे | Pune

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे आज पुणे दौऱ्यावर (Pune Visit) येणार होते. मात्र, काल रात्री पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. मोदी यांच्या हस्ते आज मेट्रो प्रकल्पाचे उद्धघाटन होणार होते. त्यांची एस.पी. कॉलेजच्या मैदानावर सभा होणार होती. मात्र, त्यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती एएनआयने (ANI) आपल्या सोशल मीडियावर दिली आहे. हा दौरा तात्पुरता रद्द करण्यात आल्याचे बोलले जात असून लवकरच या दौऱ्याची नवीन तारीख जाहीर केली जाणार आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज तब्बल १२ विकासकामांचे उद्घाटन तसेच मेट्रोच्या मार्गाचे लोकार्पण होणार होते. पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानावर सभेचे देखील आयोजन करण्यात आले होते. मात्र, या सभेवर गेल्या तीन दिवसांपासून पावसाचे सावट असल्यामुळे ही सभा होणार का नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर आज पंतप्रधान कार्यालयाकडून मोदींचा पुणे दौरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Nashik : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येणार – केंंद्रीय गृहमंत्री अमित शहा

स्वारगेट ते सिविल कोर्ट या भूमिगत मेट्रोचा लोकार्पण देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. एस पी कॉलेजच्या मैदानावर कालपासून प्रशासनाकडून तयारी देखील करण्यात आली होती. पावसाचे सावट लक्षात घेता सभेचे ठिकाण देखील बलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पर्यायी सभास्थळ म्हणून गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी देखील तयारी करण्यात आली होती. मात्र पुण्यात होत असलेल्या पावसामुळे पंतप्रधानांचा दौरा रद्द करण्यात आला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या