Friday, May 31, 2024
Homeदेश विदेशIsrael Palestine War : इस्रायलच्या पंतप्रधानांचा PM नरेंद्र मोदींना फोन; काय झाली...

Israel Palestine War : इस्रायलच्या पंतप्रधानांचा PM नरेंद्र मोदींना फोन; काय झाली चर्चा?

नवी दिल्ली | New Delhi

इस्रायल आणि पॅलेस्टाईन (Israel and Palestine War) यांच्यातील अनेक वर्षांपासूनचा सुरु असलेला वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने (Hamas) शनिवारी (७ ऑक्टोबर) रोजी पहाटे इस्रायलवर रॉकेट हल्ला (Rocket Attack) केला. या हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. या हल्ल्याला इस्रायलनेही रॉकेट हल्ला करून जशास तसे प्रत्युत्तर दिले. तेव्हापासून इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सरू आहे….

- Advertisement -

पोलिसांची मोठी कारवाई! ड्रग्ज माफिया भूषण पाटीलसह साथीदाराला वाराणसीतून अटक

आज युद्धाचा चौथा दिवस असून आतापर्यंत या युद्धात (War) दोन्ही बाजूचे सुमारे १६०० लोक मृत्यूमुखी पडले आहेत. तर ७,००० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरु असलेल्या युद्धाला मध्य पूर्वेतील अनेक मुस्लीम राष्ट्रांनी पॅलेस्टाईनला तर भारत अमेरिका आणि युरोपातील काही देशांनी इस्रायलला पाठिंबा दर्शवला आहे. अशातच आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू (PM Benjamin Netanyahu) आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची फोनवरून या युद्धाबाबत चर्चा झाली आहे. त्यासंदर्भातील माहिती स्वत: पंतप्रधान मोदींनी आपल्या एक्स (ट्वीट) वर पोस्ट करत दिली आहे.

पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी मला फोन (Call) करून तिथल्या परिस्थितीची माहिती दिली, याबाबत मी त्यांचे आभार मानतो. या बिकट परिस्थितीत आम्ही भारतीय लोक इस्रायलच्या बाजूने खंबीरपणे उभे आहोत. भारत अशा दहशतवादी कृत्यांचा तीव्र आणि निःसंदिग्धपणे निषेध करतो.

महायुती सरकारचा विधीमंडळ समित्यांचा फॉर्म्युला ठरला! भाजप मोठा भाऊ पण चलती मात्र लहान भावांची

दरम्यान, पॅलेस्टाईनमधील कट्टरतावादी संघटना हमासने शनिवार (दि.०७ ऑक्टोबर) रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ला चढवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या रॉकेट हल्ल्याला दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले होते. तर पंतप्रधान मोदींनी आपल्या एक्स (ट्वीट) वर लिहिले होते की, इस्रायलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने धक्का बसला आहे. मृतांच्या कुटुंबीयांबाबत शोक व्यक्त करत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Shivsena Dasara Melava : यंदाही शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच आवाज घुमणार; शिंदेंच्या शिवसेनेची माघार, केसरकरांनी सांगितलं कारण

- Advertisment -

ताज्या बातम्या