सुरगाणा । प्रतिनिधी Surgana
गेल्या साठ वर्षात सुरगाणा तालुक्यात अनेकांनी सत्ता भोगली, काहींनी तर चाळीस वर्षे एक हाती सत्ता उपभोगली मात्र केंद्र शासनाच्या यादीत सुरगाणा तालुक्याची आकांक्षित तालुका म्हणून ओळख निर्माण करुन ठेवली आहे. ही ओळख विकासाच्या माध्यमातून पुसून काढू तरच पुन्हा सुरगाणा तालुक्यातील जनतेला तोंड दाखवेल असे आश्वासन राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सुरगाणा येथे केले.
पोलीस परेड मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचे उमेदवार आमदार नितीन पवार यांच्या प्रचार सभेत नामदार मुंडे बोलत होते. व्यासपीठावर आमदार नितीन पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार, कळवणचे नगराध्यक्ष कौतिक पगार, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, राजेंद्र भामरे, राजेंद्र पवार, गोपाळ धूम, नवसू गायकवाड, राजू पाटील,हेमंत पाटील, भास्कर अलबाड, मोहन जाधव,तुळशीराम महाले, युवराज लोखंडे, हरिभाऊ भोये आदी उपस्थित होते.
यावेळी मुंडे यांनी सांगितले की, तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडतो.पाणी मात्र अरबी समुद्राला वाहून जाते. हेच पाणी लहान धरणे बांधून स्थानिक शेतकर्यांना उपलब्ध करून दिले जाईल. पवार घराणे व आमचे जुने नाते आहे. मी प्रथमच विधानपरिषदेत निवडून गेल्यावर स्वर्गीय ए. टी. पवार यांनी मला आशीर्वाद दिला होता. पाणदेवाचा वारसा चालविणारे नितीन पवार यांची दुसरे पाणदेव म्हणून भविष्यात ओळख निर्माण होणार असल्याचे सांगितले.
मुंडे पुढे म्हणाले की गेल्या पाच वर्षांत दोन हजार दोनशे कोटी रुपये आमदार पवार यांनी विकासासाठी मतदार संघात निधी आणला. महाविकास आघाडी सरकारने लाडकी बहीण योजनेवर भरपूर टीका केली. पाच महिन्यांचे पैसे खात्यात पडल्याने विरोधकांची बोलती बंद झाली असून शेतकर्यांंसाठी मोफत वीज, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून स्टायपेंड सुरु केले. पेसा भरती असे धाडसी निर्णय घेण्यात आल्याचे नामदार मुंडे यांनी सांगितले. नामदार मुंडे पुढे म्हणाले की विरोधकांनी भोळ्या भाबड्या आदिवासी जनतेची फसवणूक केली. 40 वर्षात असंख्य मोर्चे काढले.पदरी काही पडले नाही. तालुक्यात लहान धरणे बांधून शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन दिले जाईल. शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट होणार आहे.
कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना बळी न पडता महायुतीच्या पाठीशी उभे रहा.विकासाची आश्वासने पूर्ण करणा-याच्या पाठीशी रहा. वन जमिनीचा स्वतंत्र सातबारा काढण्याचे आश्वासन देत कळवण मतदारसंघात कृषी भवन देणार असल्याचे सांगितले. आदिवासी संस्कृतीचा डोंगर माऊली उत्सवाला एकदा जरुर येण्याचे आश्वासन नामदार मुंडे यांनी दिले. ङ्गङ्गआमदार नितीन पवार यांनी सांगितले की, सुरगाणा येथे सभा घेणे म्हणजे भीतीचे वातावरण होते. मी निवडून आल्यानंतर हि भीती कमी झाली आहे. सुरगाणा तालुक्याची आकांक्षित तालुका असलेली ओळख येत्या पाच वर्षांत विकासाच्या माध्यमातून पुसून टाकणार असल्याचे सांगितले.
आमदार पवार पुढे म्हणाले की सुरगाणा तालुक्यातील स्थलांतर रोखण्यासाठी प्रयत्न करणार असून शेती करिता पाणी उपलब्ध करुन कळवण तालुक्याच्या बरोबरीने विकास केला जाईल. भात, सफेद मुसळी, स्ट्राबेरी, भेंडी, दुग्धव्यवसाय केला जातो.यासाठी पाणी उपलब्ध करुन दिले जाईल.गेल्या 40 वर्षात फक्त मोर्चे काढले.वन जमीनीचा स्वतंत्र सातबारा झाला नाही. राज्यात सरकार आल्यावर वनपट्टे धारकांना स्वतंत्र सातबारा देणार असून शेतकर्यांना मिळणार्या सर्व लाभाच्या योजना देण्यात येतील असे आमदार पवार यांनी सांगितले.
आमदार पवार पुढे म्हणाले की गेल्या पाच वर्षांत 2200 कोटी रुपयांचा निधी आणून श्रीभूवन येथे धरण, नार, पार, अंबिका, तान, मान या नद्यांवर सिमेंट बंधारे बांधले आहेत.बा-हे येथे स्वतंत्र वीज फिडर केले आहे. भविष्यात कनाशी येथून स्वतंत्र वीज पुरवठा करुन तालुक्यातील वीजेचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यात येईल. लाडकी बहिण योजनेला विरोध केला जातो आहे. विरोधक अपप्रचार करीत आहेत. या योजनेच्या माध्यमातून महिला आर्थिक सक्षमतेने वाटचाल सुरू केली असल्याचे सांगितले ङ्गङ्गवळण योजना बंद करून छोटे छोटे धरण बांधून कोणाचेही विस्थापन न करता पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे.
पुढील काळात तीन हजार कोटींची कामे तालुक्यात आणून गेल्या चाळीस वर्षांच्या काळातील रखडलेला विकास भरून काढला जाणार आहे. समाजाच्या विकासासाठी मेलो तरी बेहत्तर पण समाजाचा विकास करणारच असा निर्धार करून मतदान करण्याचे आवाहन आमदार पवार यांनी केले. यावेळी मनोज शेजोळे,आनंदा झिरवाळ, योगेश ठाकरे, यमुना झिरवाळ, पुंडलिक खंबायत, रामदास केंगा,दीपक मेघा,रमेश बागुल सह गाव, वाडी, वस्ती पाड्यावरुन बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.