Monday, June 24, 2024
Homeराजकीय"भाजपची पुन्हा सत्ता आली तर..."; पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारवर हल्लाबोल

“भाजपची पुन्हा सत्ता आली तर…”; पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई | Mumbai

- Advertisement -

आजपर्यंत देशातील सरकारं लोकशाही आणि संविधानाच्या तत्त्वांवर काम करत होती. मात्र 2014 पासून भाजपचे सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करत आहे. भाजप (BJP) सरकार पुन्हा सत्तेत आल्यास देशात चीन, रशियासारखी हुकूमशाही येईल, असा घणाघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केला आहे.

काँग्रेसच्या (Congress) जनसंवाद पदयात्रेनिमित्त कोळे (ता. कराड) येथील जाहीर सभेत पृथ्वीराज चव्हाण यांनी वरील वक्तव्य केले आहे. यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, केंद्र आणि राज्यासमोर कोणते प्रश्न आहेत? हे सर्वसामान्यांना कळावे, यासाठी भारत जोडोनंतर जनसंवाद पदयात्रा काढण्यात आली आहे.

नवनीत राणांविरोधात काँग्रेस आक्रमक; निवडणूक आयोगाकडे केली मोठी मागणी

सुमारे सात हजार शाळा खासगीकरणाकडे वाटचाल करत आहेत. गॅस आणि तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. नोकरी भरती नाही, कंत्राटी पद्धतीने नोकऱ्या दिल्या जात आहेत. केवळ तेलावर कर लादून मोदींनी 30 लाख कोटी रुपये उभे केले असल्याची टीका त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, सरकार हुकमशाही पद्धतीने वागत आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) नेतृत्वाखालील सरकार पुन्हा निवडून आले, तर आपल्या देशात चीन, रशियासारखी हुकूमशाही येईल. लोकांना कुठलेही अधिकार नसतील. लोकशाही टिकवण्यासाठी स्वातंत्र्याचे हे दुसरे युद्ध जिंकलेच पाहिजे, असे आवाहन त्यावेळी यावेळी केले.

या सभेला काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, नामदेव पाटील, कोळे गावच्या सरपंच भाग्यश्री देसाई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाना पटोलेंच्या ‘त्या’ आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले…

- Advertisment -

ताज्या बातम्या