Tuesday, March 25, 2025
Homeनगरनगरमधील खासगी रुग्णालयाची होणार तपासणी

नगरमधील खासगी रुग्णालयाची होणार तपासणी

तपासणीसाठी सात वैद्यकीय अधिकार्‍यांची नियुक्ती

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी नियम, 2021 अंतर्गत राज्यातील नोंदणीकृत खाजगी रुग्णालयाची तपासणी करुन दैनंदिनी अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने दिले आहेत. महिनाभरात ही तपासणी पुर्ण करून त्याचा दैनंदिन अहवाल आरोग्य सेवा आयुक्तालयास सादर करावा, असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला दिले आहेत. त्यानुसार सातही आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकार्‍यांना या तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

खासगी रुग्णालयांकडून महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी नियम, 2021 अंतर्गत नियमांचे काटेकोर पणे पालन होते किंवा नाही, याची खातरजमा या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्राधान्याने रुग्णालयामध्ये आकारण्यात येणार्‍या फी व इतर रुग्णालयीन सेवेचे शुल्क, दरपत्रक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावण्यात यावे. तसेच महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी नियम, 2021 मधील अंतर्भूत रुग्ण हक्क संहिता रुग्णालयाच्या दर्शनी भागात स्वच्छ अक्षरात लावण्यात यावी, असे निर्देश आहेत. याबाबत तसेच, रुग्णालयातील मंजूर खाटा व प्रत्यक्षात असलेल्या खाटा संख्या, अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र व फायर ऑडिट, जैववैद्यकीय कचर्‍याची विल्हेवाट, नर्सिंग क्टची अंमलबजावणी आदींची महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकार्‍यांकडून तपासणी करण्यात येणार आहे.

याबाबतची संपूर्ण कार्यवाही एक महिन्यांत पूर्ण करावयाची असल्याने दैनंदिन रुग्णालय तपासणीचा अहवाल करुन एकत्रित अहवाल आयुक्तालयास सादर करावा. यात सर्व नोंदणीकृत रुग्णालयांकडून महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी नियम 2021 मधील नियमांचे काटेकोरपणे पालन होते किंवा नाही, याची खातरजमा करून स्पष्ट अहवाल द्यावा. आपल्या कार्यक्षेत्रातील दैनंदिन 2 ते 5 रुग्णालयांची तपासणी करून कार्यालयाकडे सादर करावा, अशा सूचना वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी तपासणीसाठी नियुक्त केलेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...